मॉब लिंचिंगचा गंभीर प्रकार, कोरोनाच्या संशयावरून लाथा-बुक्क्यांनी 22 वर्षाच्या तरुणाची केली हत्या

मॉब लिंचिंगचा गंभीर प्रकार, कोरोनाच्या संशयावरून लाथा-बुक्क्यांनी 22 वर्षाच्या तरुणाची केली हत्या

कोरोनाव्हायरस पसरवण्याच्या षडयंत्र रचल्याच्या संशयावरून लोकांकडून एका 22 वर्षीय व्यक्तीवर निर्घृण हल्ला करण्यात आला आणि त्याचा मृत्यू झाला.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 एप्रिल : लॉकडाऊनमध्ये हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क कोरोनाव्हायरस पसरवण्याच्या षडयंत्र रचल्याच्या संशयावरून लोकांकडून एका 22 वर्षीय व्यक्तीवर निर्घृण हल्ला करण्यात आला आणि त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. मेहबूब अली असं या युवकाचं नाव आहे. पोलिसांनी सांगितले की अली तबलीगी जमातच्या कार्यक्रमासाठी मध्य प्रदेशातील भोपाळ इथे गेला होता आणि भाजीपालाने भरलेल्या ट्रकमध्ये 45 दिवसानंतर दिल्लीला परतला.

पोलिसांनी सांगितले की, मेहबूब अली आझादपूर हे भाजी मार्केटमधून पकडला गेला, परंतु वैद्यकीय तपासणीनंतर त्याला सोडण्यात आलं. जेव्हा तो त्याच्या गावी पोहोचला तेव्हा अफवा पसरली की महबूब अलीचा कोरोना विषाणू फैलावण्याचा कट आहे. त्यामुळे रविवारी शेतात नेऊन त्याला मारहाण केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. नंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले जेथे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक केली आहे.

स्थानिक व्यक्तीने दोन महिला डॉक्टरांशी गैरवर्तन केले

त्याचवेळी एका स्थानिक व्यक्तीने दिल्लीतील गौतम नगर भागात राहणाऱ्या सफदरजंगच्या दोन महिला डॉक्टरांशी गैरवर्तन केले. कोरोना पसरल्याचा आरोप करीत आरोपींनी दोन्ही डॉक्टरांवर हल्ला केला. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही महिला डॉक्टर सफदरजंग रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात कार्यरत आहेत. आता यासंदर्भात महिला डॉक्टरांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्यानंतर पोलिसांनी डॉक्टरांना मारहाण व शिवीगाळ केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक केली आहे.

माहितीनुसार, दोन्ही महिला डॉक्टर बुधवारी रात्री 9.30 वाजता कामावरून परत आल्यानंतर काही महत्त्वाच्या वस्तू घेण्यासाठी गुलमोहर एन्क्लेव्हजवळील एका दुकानात गेले. येथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने त्यांना प्रथम सामाजिक अंतराबद्दल सांगितले. यासंदर्भात आपल्याकडे माहिती असल्याचे दोन्ही डॉक्टरांनी सांगितले तेव्हा आरोपी संतप्त झाले व त्यांनी गुन्हा नोंदवण्याची धमकी देऊ केली.

जेव्हा डॉक्टरांनी याकडे लक्ष दिले नाही, तेव्हा तो ओरडू लागला की दोघे कोरोना पसरवित आहेत. जेव्हा ती तिथून निघू लागली तेव्हा आरोपीने तिचा मार्ग अडविला आणि तिच्यावर मारहाण करण्यास सुरवात केली. यासह, त्याने दोन्ही डॉक्टरांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. नंतर हे प्रकरण वाढत पाहून तो तेथून निघून गेला. यानंतर दोन्ही डॉक्टरांनी पोलिसांशी संपर्क साधला. या प्रकरणी तातडीने कारवाई करत पोलिसांनी दोन्ही डॉक्टरांची वैद्यकीय तपासणी केली आणि गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

संपादन - रेणुका धायबर

First published: April 9, 2020, 10:50 AM IST

ताज्या बातम्या