मुजफ्फरगढ, 31 मे : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात असा एक प्रकार घडला की सर्वांनाच चक्रावून टाकलं आहे. एका व्यक्तीला तिसरं लग्न करणं महागात पडलं. या लग्नाची माहिती दुसऱ्या पत्नीला होताच तिने याचा बदला घेतला. महिलेनं पतीच्या अंगावर गरम पाणी फेकलं. यामुळे डॉक्टर अब्दुल रशीद असं नाव असलेल्या पतीचं शरीर 45 टक्के भाजलं आहे. महिलेविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मुजफ्फरगढ शहरातील डॉक्टर अब्दुल रशीद यांनी तिसरं लग्न केल्यानंतर त्यांच्या दुसऱ्या पत्नीनं रागाच्या भरात त्यांच्यावर हल्ला केला. एआरवाय न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, रशीद यांनी तिसऱ्यांदा लग्न केलं होतं. यानंतर त्यांच्या दुसऱ्या पत्नीला राग आला. याचा बदला घेण्यासाठी त्यांनी थेट पतीवर गरम पाणी फेकलं.
हे वाचा-कोरोनाच्या धास्तीनं पोलिसांनी चक्क आरोपीला सोडलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार
पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केल्यानंतर लगेच सोडून दिलं. पीएमए यांचे म्हणणे आहे की, आरोपी महिलेविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र महिलेला सोडून का देण्यात आलं याबाबत काही समजू शकले नाही. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
पतीच्या अंगावर गरम पाणी ओतण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही. याआधीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. दरम्यान, डॉक्टर अब्दुल रशीद यांनी अनेक लग्नं केली असल्याचं म्हटलं जात आहे. त्यांच्या दुसऱ्या पत्नीने त्यांच्यावर गरम पाणी ओतून भाजलं. यामागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र पतीच्या तिसऱ्या लग्नामुळेच ती चिडली होती आणि यामुळे रागाच्या भरात हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे.
हे वाचा-महिलेने मॅट्रिमोनिअल साइटवर तरुणाला पाठवले खासगी फोटो, नंतर घडला गंभीर प्रकार
संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pakistan