मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

कोरोनाच्या संकटात मुलांना सांभाळणं झालंय अवघड; 8 वीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

कोरोनाच्या संकटात मुलांना सांभाळणं झालंय अवघड; 8 वीच्या विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

संजय नाईक अस आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो मूळचा नागपूरमधील आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. (Symbolic Photo)

संजय नाईक अस आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो मूळचा नागपूरमधील आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. (Symbolic Photo)

कोरोना काळात गेल्या दीड वर्षांहून अधिक काळापासून विद्यार्थ्यांची घरातून शाळा सुरू आहे. त्यामुळे कधी नव्हे ते मोठ्या प्रमाणात मुलं मोबाइल किंवा लॅपटॉपसमोर बसलेले दिसतात.

  • Published by:  Meenal Gangurde

सूरत, 13 मे : गुजरातमध्ये सुरत शहरातील 13 वर्षांच्या एका मुलाचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या मुलाच्या मृत्यूबाबत दोन गोष्टी समोर येत आहे. काहींच्या मते याचा मृत्यू घरात स्टंट करीत असताना झाल्याचं सांगितलं जात आहे. मात्र कोरोनाच्या या संकटकाळात जेथे लोकांना एकटेपण अनुभवावं लागत असताना वेगळचं कारण समोर आलं आहे.

कोरोना काळात गेल्या दीड वर्षांहून अधिक काळापासून विद्यार्थ्यांची घरातून शाळा सुरू आहे. त्यामुळे कधी नव्हे ते मोठ्या प्रमाणात मुलं मोबाइल किंवा लॅपटॉपसमोर बसलेले दिसतात. आतापर्यंत मोबाइलचं व्यसन लागू नये म्हणून मुलांपासून मोबाइल किंवा तत्सम यंत्र लांब ठेवले जात होेते. मात्र कोरोनामुळे मात्र मुलं बराच काळ मोबाइल घेऊन क्लासेस आणि नंतर गेम खेळणे, व्हिडिओ पाहत असताना दिसत आहे. या घटनेतही पोलिसांकडून आत्महत्येच्या अँगलकडेही लक्ष केंद्रिय केल्याचे दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुरतमध्ये 13 वर्षांच्या एका मुलाचा गुदमरल्यामुळे मृत्यू झाला आहे. हा मुलगा घरात स्टंट करीत होता, त्यादरम्यान रश्शी त्याच्या गळ्याभोवती आवळली गेली. पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितलं की, मुलाच्या आई-वडिलांनुसार आठवीतील मुलगा स्टंटचे व्हिडिओ तयार करीत असे. हे व्हिडिओ तो सोशल मीडियावर शेअर करीत होता.

सरथाना पोलीस ठाण्याचे इन्स्पेक्टर एम के गुर्जर यांनी सांगितलं की, ही घटना बुधवारी सायंकाळी घडली. मुलगा आपल्या घराच्या दाराला लावलेल्या खुंटीवर बांधलेल्या रश्शीला लटकलेल्या अवस्थेत सापडला. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सायंकाळी 5 दरम्यान झाल्याची शक्यता आहे. यावेळी घरात दुसरं कोणीचं नव्हत. मुलगा सायंकाळी 6.30 वाजता रश्शीला लटकलेल्या अवस्थेत दिसला. ज्यानंतर तातडीने त्याला जवळील रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे पोहोचल्यानंतर त्याला मृत घोषित करण्यात आले.

त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात मुलाच्या आई-वडिलांनी सांगितलं की, त्याचा मृत्यू स्टंटमुळे झाला आहे. मात्र या प्रकरणात पोलीस आत्महत्येच्या अँगलनेही तपास करीत आहे. काही दिवसांपूर्वी मुलाच्या आई-वडिलांनी त्याला मोबाइलचा वापर करण्यापासून रोखलं होतं.

हे ही वाचा-धक्कादायक! भलत्याच कारणामुळे पत्नीची गळा आवळून केली हत्या, स्वतःही दिला जीव

मृताच्या मित्रांनी आणि आई-वडिलांनी सांगितलं की, त्याला गाणं, नृत्य आणि स्टंट करण्याची आवड होती. अधिकाऱ्याने सांगितलं की, स्टंट करताना त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता असल्याचे त्याच्या आई-वडिलांनी सांगितलं. तर दुसरीकडे फोन देण्यास नकार दिल्यामुळे त्याने रागाच्या भरात आत्महत्या केल्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

First published:

Tags: Corona updates, Student, Suicide