नवी दिल्ली, 23 मार्च : देशभरात कोरोनाची (corona) लाट आता ओसरत चालली आहे. ठीक दोन वर्षांपूर्वीच आजच्या दिवशी देशभरात लॉकडाऊन (lockdown) सुरू झाला होता आणि अनेक निर्बंध लावण्यात आले होते. पण, आता कोरोनाची लाट ओसल्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस सर्व निर्बंध हटवले जाणार असल्याची घोषणा केंद्र सरकारकडून (central government) करण्यात आली आहे. फक्त मास्क आणि सहा फूट अंतर राखण्याची नियम लागू राहणार आहे.
केंद्र सरकारने एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने घट होत असताना केंद्रीय गृहमंत्रालयाने महामारी रोखण्यासाठी लादलेले सर्व निर्बंध संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे. ३१ मार्चपासून कोरोना निर्बंध संपणार आहेत. दोन वर्षांनंतर देशातील जनतेची या निर्बंधातून सुटका झाली. आता फक्त सहा फुटाचे अंतर राखावे लागणार असून मास्क लावावा लागणार आहे.
(IPL 2022: आयपीएल तिकीट विक्रीला सुरुवात, कुठे खरेदी करू शकता? घ्या जाणून)
केंद्र सरकारने आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत 24 मार्च 2020 रोजी प्रथमच कोरोनाची मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. यानंतर अनेक वेळा या मार्गदर्शक तत्त्वात बदल करण्यात आले. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, 'गेल्या 24 महिन्यांत महामारी व्यवस्थापनासाठी विविध क्षमता विकसित करण्यात आल्या आहेत. यामध्ये चाचणी, पाळत ठेवणे, संपर्क शोधणे, उपचार, लसीकरण, रुग्णालयांचा विकास यांचा समावेश आहे'.
DCGI ने Novavax लसीला दिली मान्यता
दरम्यान, डेल्टाक्रॉन(Deltacron) या कोरोना विषाणूच्या नवीन प्रकाराने भारतात दार ठोठावले असून महाराष्ट्र-दिल्लीसह 7 राज्यांमध्ये 568 प्रकरणांची तपासणी सुरू आहे. दरम्यान, नोव्हावॅक्स(Novavax) कोविड-19 लसीच्या आपत्कालीन वापरास मान्यता देण्यात आली आहे. नोव्हॉवॅक्सने भारतात 12-18 वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोविड-19 लसीच्या आपत्कालीन वापरासाठी मान्यता जाहीर केली आहे.
(IPL 2022 : 'BCCI चा तो नियम मूर्खपणाचा', नवी इनिंग सुरू होताच शास्त्रींचा सिक्सर)
भारतातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) ही लस बनवत आहे. भारतात ती Covovax या नावाने ओळखली जाईल. ही पहिली प्रोटीन-आधारित लस आहे.सप्टेंबर 2020 मध्ये नोवाव्हॅक्सने सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियासोबत करार केला होता. 2 बिलियन लसींची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.