सचिन जिरे,प्रतिनिधी
औरंगाबाद, 02 ऑक्टोबर : शहरात शिक्षण घेणाऱ्या तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून बळजबरीने धर्मांतर करून लग्न केले. लग्नानंतर तीन महिन्यांची गर्भवती असलेल्या पत्नीस एक लाखासाठी बेदम मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
या प्रकरणी विवाहितेच्या पतीसह अन्य दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज तरुणीने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन पतीचा मामा आणि त्याच्या संपर्कातील अनेकांनी देखील अत्याचार केल्याची तक्रार केली.
तब्बल 6 वर्ष 'त्या' VIDEO ची धमकी देऊन पोलिसाने तिच्यावर गेले अत्याचार,पण अखेर..
परभणी जिल्ह्यातील 24 वर्षीय तरुणी औरंगाबादेत शिक्षण घेत असताना ती बीड बायपास परिसरात राहत होती. तिची सोशल मीडियावर बेगमपुरा येथील नॅशनल कॉलनीतील राहणाऱ्या मोहम्मद उमर मोहम्मद जावेदसोबत मैत्री झाली.
ओळखीतून उमर याने तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ओळखीनंतर उमर याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर उमरने तिच्यावर बीड बायपास येथील घरात बलात्कार केला. काही दिवसांनी पीडित तरुणीने त्याच्याकडे लग्नाचे विचारले असता उमर याने लग्न करण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला. पीडित तरुणीने सातारा पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि मोहम्मद नूर आणि मोहम्मद इस्माइलविरोधात तक्रार दाखल केली. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
नदीपात्रात 3 मुलांसह पती-पत्नीचे तरंगत होते मृतदेह, कारण ऐकून गाव हादरले
पोलिसांमध्ये प्रकरण गेल्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी उमर याने सदर मुलीचे धर्मांतर केले आणि तिच्यासोबत लग्न केले. पण लग्नानंतर तीन महिन्यांनी पतीकडील लोकांनी छळ करण्यास सुरूवात केली. माहेरहून 'एक लाख रुपये घेऊन ये', असा तगदा लावला. पण पीडित तरुणीने नकार दिल्यामुळे तिला बेदम मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. या प्रकरणी तरुणीने बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी तिला परत पाठविले.
त्यानंतर हा प्रकार शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना माहिती झाला. खैरे यांनी या प्रकरणी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. पीडित तरुणाने आपल्यासोबत झालेली सर्व हकीकत पोलीस आयुक्तांना सांगितली. त्यानंतर बेगमपुरा पोलीस ठाण्यात मोहम्मद उमर मोहम्मद जावेद, मोहम्मद इब्राहिम, सह एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.