• Home
  • »
  • News
  • »
  • crime
  • »
  • बोकडाचे हाड देण्याच्या प्रथेवरून वाद, कुटुंबात सदस्य परस्परांमध्ये भिडले

बोकडाचे हाड देण्याच्या प्रथेवरून वाद, कुटुंबात सदस्य परस्परांमध्ये भिडले

सेवालाल महाराज जयंतीनिमित्त बोकडाचे हाड देण्याच्या मानावरून एका कुटुंबात जोरदार हाणामारी झाल्याची घटना भिवंडी तालुक्यातील पूर्णा येथे घडली.

  • Share this:
भिवंडी,18 फेब्रुवारी:सेवालाल महाराज जयंतीनिमित्त बोकडाचे हाड देण्याच्या मानावरून एका कुटुंबात जोरदार हाणामारी झाल्याची घटना भिवंडी तालुक्यातील पूर्णा येथे घडली. याप्रकरणी नारपोली पोलिस स्टेशनमध्ये कुटुंबातील सदस्यांनी परस्पराविरूद्ध उशिरा गुन्हा दाखल केला आहे. ताराबाई पांडुरंग राठोड (वय-55) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दीपक हेमलु राठोड (वय- 50), पत्नी कमलीबाई दीपक राठोड, मुलगा गोविंद दीपक राठोड, मुलगा सचिन दीपक राठोड (सर्व रा. पूर्णा) असे कुटुंबात झालेल्या हाणामारीप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. हेही वाचा... तर इंदोरीकर महाराजांसाठी संभाजी भिडे रस्त्यावर उतरून करणार आंदोलन याबाबत मिळालेली माहिती अशी की, सेवालाल महाराज जयंतीनिमित्त बोकडाच्या हाडाचा मान देण्याची प्रथा या राठोड कुटुंबाची असून यावर्षी हा बोकडाच्या हाडाचा मान ताराबाई यांच्या लहान सासऱ्यांचा होता. मात्र तरी जाणीवपूर्वक गोविंद याने हा मान दिला होता. यावरून नाराज झालेल्या ताराबाई यांचा मुलगा लक्ष्मण राठोड याने गोविंदने दिलेले मानाचे हाड गोविंद यांच्याकडे परत करायला गेला. याचा राग आल्याने गोविंदने ताराबाई यांच्या मुलास लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तसेच ताराबाई यांचे पती पांडुरंग राठोड यांच्या डोक्यावर कमलीबाई राठोड यांनी जेवणाचा डबा व तांब्या फेकून मारला. यात पांडुरंग राठोड यांना गंभीर दुखापत झाली आहे. सचिन याने लाथामारल्या तर दीपक राठोड यांनी कमलाबाई यांच्या डोक्यावर तांब्या मारून दुखापत केल्याप्रकरणी नारपोली पोलिस स्टेशनमध्ये दीपक, कमली, गोविंद व सचिन या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा... धक्कादायक: अवघ्या पाच महिन्यांच्या तान्हुलीवर चुलत भावाकडून बलात्कार
Published by:Sandip Parolekar
First published: