Home /News /crime /

किन्नर एकता जोशी हत्या प्रकरण: आरोपींना मिळालेली 55 लाखाची सुपारी; सांगितलं हत्येचं कारण

किन्नर एकता जोशी हत्या प्रकरण: आरोपींना मिळालेली 55 लाखाची सुपारी; सांगितलं हत्येचं कारण

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं (Delhi Police Special Cell) दोन कॉन्ट्रॅक्ट किलर्सला (Contract Killers) अटक केली आहे. किन्नर एकता जोशीची हत्या करण्यासाठी त्यांना 55 लाखांची सुपारी मिळाली होती.

    नवी दिल्ली 12 एप्रिल: दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं (Delhi Police Special Cell) एक लाख आणि 50 हजार बक्षीस जाहीर असलेल्या दोन कॉन्ट्रॅक्ट किलर्सला (Contract Killers) अटक केली आहे. अटकेनंतर पोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे. प्रकरण दोन किन्नर (transgender) गटांमधील वर्चस्वाचं होतं. याच पार्श्वभूमीवर या आरोपींना सुपारी देऊन किन्नर एकता जोशीची हत्या करण्यात आली होती. काय आहे प्रकरण - किन्नरांच्या दोन गटांमध्ये वर्चवस्वावरुन झालेलं भांडणं जीवघेण्या बदल्यात बदललं. याच पार्श्वभूमीवर झालेल्या हत्यांकांडासाठी भाड्याच्या हत्याऱ्यांना 55 लाखाची सुपारी दिली होती. स्पेशल सेलनं रविवारी या हत्याकांडाचा खुलासा केला. दिल्ली पोलिसाच्या स्पेशल सेलचे शिवकुमार आणि कर्मवीर यांच्या टीमनं या दोन आरोपींना अटक केली. आरोपी गगन पंडीत दिल्लीच्या पश्चिमी विहारचा रहिवासी आहे. त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एक लाखाचं बक्षीस जाहीर केलं होतं. तर, वरुण पंडीतावर 50 हजाराचं बक्षीस जाहीर होतं. 5 सप्टेंबर 2020 रोजी झालेल्या एका किन्नरच्या हत्येप्रकरणी पोलीस या दोघांचा शोध घेत होते. स्पेशल सेलनं दिलेल्या माहितीनुसार, 5 सप्टेंबर 2020 रोजी स्कूटीवरुन जाणाऱ्या आमिर आणि गगननं एकता जोशी नावाच्या किन्नरची गोळी झाडून हत्या केली होती. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं होतं. अटक करण्यात आल्यानंतर आरोपी गगन पंडीतनं सांगितलं, कि किन्नर एकता जोशीच्या हत्येसाठी 55 लाखाची सुपारी मिळाली होती आणि या घटनेत सात लोकांचा सहभाग होता. गगननं चौकशीदरम्यान सांगितलं, कि तो किन्नर एकता जोशी हत्येचा मास्टरमाइंड होता. गगनच्या म्हणण्यानुसार, किन्नरांच्या एका दुसऱ्या ग्रुपचा सदस्य असलेल्या मंजूर इलाहीनं गगनला फोन करुन एकता जोशी आणि तिची सावत्र आई अनीता जोशी यांची हत्या करण्यास सांगितलं होतं. मागील वर्षी पाच सप्टेंबरला एकतावर सहा गोळ्या झाडल्या होत्या, यातच एकताचा मृत्यू झाला होता. गगनवर याशिवाय हत्या, हत्येचा प्रयत्न आणि लुटमारीचेही अनेक गुन्हे उत्तर प्रदेशात दाखल आहेत.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Murder, Shocking news, Transgender

    पुढील बातम्या