फरीदाबाद, 1 नोव्हेंबर : वल्लभगडमधील निकिता हत्याकाडांचा आरोपी तौसीफ याने पोलिसांना एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. त्याने निकिताची हत्या वेब सीरिज मिर्झापूर पाहून केल्याचे तो आपल्या जबाबात म्हणाला आहे. या वेब सीरीजमध्ये मुन्ना भैया (दिव्येंदु शर्मा) देखील एकतर्फी प्रेमातून स्वीटीवर (श्रेया पिलगांवकर) गोळी झाडतो, त्यानंतर त्याचा मृत्यू होतो. फरीदाबाद जिल्ह्यातील वल्लभगड भागात सोमवारी परीक्षा देऊन घरी परतणाऱ्या बीकॉम तृतीय वर्षाची विद्यार्थीनी (21 वर्षीय) निकितावर गोळी मारुन हत्या करण्यात आली होती. हत्येचा आरोप काँग्रेस आमदार आफताब अहमद यांचा चुलत भाऊ तौसिफ याच्यावर आहे. तौसिफने पोलीस कस्टडीमध्ये असताना त्यानेच निकिताची हत्या केल्याचा आरोपी कबुल केला आहे. मिर्झापूर वेब सीरिज पाहिल्यानंतर निकिताच्या हत्येचा प्लान बनविल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.
तौसिफला निकितासोबत लग्न करायचे होते. त्यासाठी तो काॅलेजच्या बाहेर निकिताला आणण्यासाठी तिची वाट पाहत होता. जशी निकिती काॅलेजच्या बाहेर आली, तौसिफ तिला जबरदस्तीने कारमध्ये बसवू लागला. मात्र निकिता नकार देत त्याचा विरोध करू लागली. यानंतर आरोपीने निकितावर गोळी झाडली व तिची हत्या केली.
हे ही वाचा-क्रौर्याची सीमा ओलांडली! 90 वर्षांच्या वृद्ध महिलेवर घरात घुसून सामूहिक बलात्कार
तपासासाठी SIT चे गठण
यापूर्वी गुरुवारी निकिता हत्याकांडाचा तपास करण्यासाठी एसआयटीचं गठन करण्यात आलं होतं. पोलीस कमिश्नर ओपी सिंह यांनी DCP यांच्या देखरेखीखाली एसआयटीचं गठन केलं आहे. एसीपी अनिल यादव एसआयटीचे अध्यक्ष असतील आणि या टीममध्ये आणखी 4 जणांचा समावेश असेल. एसआयटी टीममध्ये क्राइम ब्रांच प्रभारी अनिल, सब इन्स्पेक्टर रामवीर, ASI कॅप्टन सिंह आणि प्रधान कॉन्स्टेबल दिनेश कुमार सहभागी होतील. केसचे मुख्य आरोपी तौसिफ याच्यावर अवैधरित्या देसी कट्टा उपलब्ध करून देणाऱ्या अजरु सह दोघांना न्यायालयात हजर केल्यानंतर तुरुंगात पाठविण्यात येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news