Home /News /crime /

काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारेंच्या भावावर बलात्काराचा गुन्हा, मुंबई पोलिसांनी केली अटक

काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारेंच्या भावावर बलात्काराचा गुन्हा, मुंबई पोलिसांनी केली अटक

सुनीत वाघमारे याच्याविरोधात एका 28 वर्षीय तरुणीने बलात्कार आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली होती.

मुंबई, 02 मार्च : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. अशातच काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे (Raju Waghmare) यांचे भाऊ सुनीत वाघमारे (Sumit Waghmare) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. सुनीत वाघमारेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सुनीत वाघमारे वर महिलेचा बलात्कार, फसवणूक आणि धमकावण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली आहे. सुनीत वाघमारे हे माझी स्वीकृत नगरसेवक राहिले असून काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांचे भाऊ आहेत. सुनीत वाघमारे याच्याविरोधात एका 28 वर्षीय तरुणीने बलात्कार आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली होती. तिच्या तक्रारीवरून  मुंबईच्या भोईवडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असून तपासासाठी तो लोणावळा पोलीस स्टेशनमध्ये वर्ग करण्यात आला आहे. आरोपी सुनीत वाघमारे याने पीडित मुलीला रेल्वेत नोकरी लावून देतो, शैक्षणिक संस्था स्थापन करणार असून तिथे तुला नोकरी लावून देतो असे आमिष देऊन जाळ्यात ओढळले होते. सुमीत हा विवाहित आहे. पण त्याने आपल्या पत्नीशी पटत नसल्यामुळे घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर पीडित तरुणीला लग्न करण्याचे वचन दिले होते. त्यानंतर पीडित तरुणीला घटस्फोट देण्यासाठी वकिलासोबत बैठक आहे असं कारण देऊन लोणावळा येथे घेऊन गेला आणि तिच्यावर बलात्कार केला. पीडित तरुणीने नकार दिला असता जीवे मारण्याची धमकी देऊन स्वत: आत्महत्या करीन, अशी धमकी  देऊन सुनीतने बळजबरीने पीडितेवर अत्याचार केला. हा प्रकार इथेच थांबला नाही, सुनीत वाघमारेनं पीडित तरुणीसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्याचे सांगून मुंबईत एक फ्लॅट सुद्धा भाड्याने घेऊन दिला होता. त्यानंतर वारंवार तिच्यावर अत्याचार केला. काही दिवसांनी पीडितेनं लग्नाचा तगादा लावल्यामुळे सुमीतने पीडितेला मारहाण केली. त्यानंतर पीडित तरुणीने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सुनीत विरोधात तक्रार दाखल केली. भोईवाडा पोलिसांनी या प्रकरणी सुनीत वाघमारे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Published by:sachin Salve
First published:

Tags: Congress, Crime, Mumbai, Rape case

पुढील बातम्या