मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

Chandrapur: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, दुचाकीस्वारांनी क्रिकेट बॅटने केली मारहाण

Chandrapur: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, दुचाकीस्वारांनी क्रिकेट बॅटने केली मारहाण

मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्यावर जीवघेणा हल्ला, दुचाकीस्वारांनी क्रिकेट बॅटने केली मारहाण

मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस नेत्यावर जीवघेणा हल्ला, दुचाकीस्वारांनी क्रिकेट बॅटने केली मारहाण

Chandrapur News: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या काँग्रेसच्या नगरसेवकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. अज्ञात इसमांनी बॅटने मारहाण केली आहे.

  • Published by:  Sunil Desale

हैदर शेख, प्रतिनिधी

चंद्रपूर, 4 मार्च : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या काँग्रेसच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला (attack on Congress leader) झाला आहे. चंद्रपुरात ही घटना घडली आहे. बाईकवरुन आलेल्या तिघांनी काँग्रेसचे नगरसेवक नंदू नागरकर (Congress Corporator Nandu Nagarkar) यांना क्रिकेट बॅटने मारहाण केली आहे. या हल्ल्यात नगरसेवक नंदू नागरकर हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Congress corporator beaten with cricket bat in Chandrapur)

चंद्रपुरात काँग्रेस नेत्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. तीन युवकांनी काँग्रेस नेते नगरसेवक नंदू नागरकर यांच्यावर हल्ला केला आहे. नागरकर यांची दैनंदिनी ज्ञात असल्याने मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या नागरकर यांना दुचाकीस्वारांनी भरचौकात क्रिकेट बॅटने मारहाण केली आहे.

तोंडावर मास्क घातलेल्या या युवकांनी आधी मुद्दाम गाडी आडवी घातली. मग अकारण भांडण उकरून काढत मराठी सिटी शाळा चौकात मारहाण केली. हल्लेखोर घटनेनंतर फरार झाले. नागरकर काँग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष- माजी स्थायी सभापती आणि विद्यमान नगरसेवक आहेत.

वाचा : वृद्ध दाम्पत्याची 5 लाखांची रोकड लुटून आरोपी फरार, बँकेसमोरील घटना CCTV मध्ये कैद

हा हल्ला नेमक्या कोणत्या कारणाने झाला याबाबत चर्चांना उत आलाय. या हल्ल्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांनी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. या घटनेनंतर चंद्रपुरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून चंद्रपूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

विरारमध्ये तरुणावर झाडल्या गोळ्या, शिवसेना नेत्यासह 9 जणांवर गुन्हा दाखल

मुंबईनजीक असणाऱ्या विरारमध्ये गेल्या महिन्यात हत्येची एक थरारक घटना उघडकीस आली आहे. येथील एका 35 वर्षीय तरुणावर दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात मारेकऱ्यांनी गोळीबार केला आहे. संबंधित तरुणाला चार गोळ्या लागल्या असून तो घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडला. यावेळी आसपासच्या लोकांनी तातडीने तरुणाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. पण याठिकाणी उपचार सुरू असताना संबंधित तरुणाची प्राणज्योत मालवली आहे. विरारमध्ये भरदिवसा हा खुनी थरार घडल्याने परिसरात भीतीचं वातावरण तयार झालं आहे.

हत्येची ही घटना उघडकीस येताच विरार पोलिसांनी शिवसेना नेत्यासह नऊ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. समय चौहान असं हत्या झालेल्या 35 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो एक व्यापारी असून फर्निचर आणि बाजार भरवण्याचं काम करत होता.

First published:

Tags: Chandrapur, Crime, काँग्रेस