लखनऊ, 16 सप्टेंबर : वडील आणि भावासह 10 जणांविरोधाल लावलेल्या सामूहिक बलात्काराच्या आरोपाबाबत महिलेने मंगळवारी पोलीस ठाण्यात मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणात पीडित महिलेने एक धक्कादायक माहिती सांगितली आहे. लग्नाच्या 17 दिवसातंच महिलेने बाळाला जन्म दिला. हा घोळ समोर आल्यानंतर सासरीही सर्वांना मोठा धक्का बसला. आपल्या चुकीवर पांघरुन घालण्यासाठी महिलेने आपले वडील व भावावरचं बलात्काराचा आरोप केला. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात एका गावात महिलेचं लग्न लखनऊमधील बंथरा भागात झालं होतं. लग्नाच्या 17 दिवसानंतर महिलेने बाळाला जन्म दिला. यानंतर मात्र महिलेच्या सासरी मोठी खळबळ उडाली. हे प्रकरण वाढेल या भीतीने महिलेने सख्खा भाऊ आणि वडिलांवर सामूहिक बलात्काराचा आरोप लावला. इतकचं नाही तर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली. या प्रकरणात वडिल व भावाकडून दुष्कृत्य झाल्यानंतर गुंतागुंत वाढली.
हे ही वाचा-इंटरनेट नसल्याने ऑनलाइन वर्ग नाही; बाईंनी गावातील भिंतीवरचं दिले गणिताचे धडे
या प्रकरणाचा तपास करीत असताना पोलिसांनी अनेकांची चौकशी केली आणि सर्वांची डीएनए टेस्टही केली. डीएनएचा रिपोर्ट आल्यानंतर दिलीप या तरुणाचे नाव समोर आले. सोमवारी रात्री उशिरा पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि मंगळवारी कोर्टात हजर केल्यानंतर तुरुंगात रवाना केले आहे. पोलिसांनी तपास केल्यानंतर आरोपीने सांगितले की पीडित महिला व त्याचे संबंध होते व त्यातच ती गर्भवती राहीली. त्यानंतर काही दिवसात तिचं लग्न झालं. ती सासरी निघून गेली. त्यानंतर काही दिवसात तिने बाळाला जन्म दिला.