Home /News /crime /

कुख्यात प्रीतीचा खेळ अखेर खल्लास, कृत्य ऐकून तुम्ही व्हाल हैराण

कुख्यात प्रीतीचा खेळ अखेर खल्लास, कृत्य ऐकून तुम्ही व्हाल हैराण

तिने अशाप्रकारे नोकरदार, व्यापारी हॉटेल व्यवसायिक आणि पोलीस दलातीलही अनेकांना आपले दास करून ठेवले होते.

नागपूर, 14 जून : फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून मैत्रीच्या जाळ्यात ओढून लुटणारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसोबतचे फोटो दाखवून खंडणी वसूल करणारी कुख्यात प्रीती दास अखेर नागपूर पोलिसांना शरण आली आहे.  खंडणी, फसवणुकीसह अनेक प्रकरणांत ती फरार होती. अखेर आता प्रीतीचा खेळ संपला असून गजाआड झाली आहे. नागपूर शहरातील समाजात वावरणारी कुख्यात गुन्हेगार प्रीती दास अखेर आज पोलिसांच्या कोठडीत पोहोचली. अतिशय थंड डोक्याची मात्र तेवढीच निर्दयी असलेल्या प्रीतीच्या गुन्हेगारीची पद्धत मोठमोठ्या खंडणीबाज गुन्हेगारांनाही लाजवून सोडणारी आहे. नागपुरातील पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असूनही प्रीतीने अलीकडे शहरात आपले स्थान निर्माण केले होते. पोलीस अधिकाऱ्यांशी मैत्री करून तिने अनेक जणांचे जगणे मुश्किल केले होते. हेही वाचा -कोरोना संकटात केंद्राकडून पुण्याला शून्य रुपयाची मदत, धक्कादायक माहिती उघड पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावून तिने अनेक जणांसोबत मैत्री केली होती. त्याचा फायदा घेत तिने पोलीस दक्षता समितीसह अनेक सामाजिक संघटनेत आपली वर्णी लावून घेतली होती. पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यक्रमाला जाऊन त्यांच्यासोबत फोटो काढायची आणि ते फोटो ती फेसबुकवर अपलोड करायची. पोलीस अधिकारी माझ्या ओळखीचे आहे असं सांगून ती अनेकांची लुटमार करायची. जर कुणी  अरेरावी दाखवली तर ती पोलिसांचा वापर करून त्याच्या अत्याचार करायची. महिला असल्याचा गैरफायदा घेत बलात्काराच्या गुन्हात अडकवण्याची धमकी देऊन खंडणी उकळत होती. याच वादातून शहरातील एका मेस चालकाने आत्महत्याही केली होती. प्रीतीची फसवणुकीची पद्धत अतिशय सरळ साधी होती. पोलीस अधिकारी आणि राजकीय नेत्यांसोबत काढलेल्या फोटोंचा अल्बम फेसबुकवर अपलोड असलेली प्रोफाइल ठेवणारी प्रीती बहुतांश फेसबुकवरच हेरत होती. हेही वाचा -घरी जाण्याची वाट कायमची चुकली, मजुरांसोबत घडले भीषण... सुरुवातील फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ती सहज त्याला जाळ्यात ओढायची. प्रीतीचा फोटो पाहून तिची फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट करणाऱ्याला तिचे मग मेसेज सुरू व्हायचे. ते उशिरा रात्रीपर्यंत चालायचे. प्रीती एकाच वेळी पाच ते सात जणांसोबत सारख्याच मेसेजचा खेळ खेळत होती. ती आपल्या दिलदार मैत्रीचा आणि खुल्या विचाराचा इजहार करीत असल्यामुळे चांगले चांगले प्रीतीच्या जाळ्यात ओढले जायचे. तिने अशाप्रकारे नोकरदार, व्यापारी हॉटेल व्यवसायिक आणि पोलीस दलातीलही अनेकांना आपले दास करून ठेवले होते. प्रीतीच्या विरोधात पाचपावली, लकडगंज आणि जरीपटका पोलीस स्टेशनमध्ये अनेक गुन्हे दाखल झाले होते. परंतु, यातूनही तिने पोलीस अधिकाऱ्यांसोबत वाटघाटी करून सुटण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी या प्रीतीला झिडकारून काढले. त्यामुळे कोणताही पर्याय पुढे नसल्यामुळे प्रीती पोलिसांसमोर हजर झाली. पोलिसांनी या ठगबाज प्रीतीला अटक केली आहे. संपादन - सचिन साळवे
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या