मुलीशी अश्लील चाळे करत होता 'मास्तर', आईच्याच आले निदर्शनास

न्यू व्यास नगरमध्ये आर्क फाउंडेशन या क्लासेमध्ये शिक्षकच आपल्या 11 वर्षीय मुलीशी अश्लील चाळे करताना चक्क मुलीच्या आईच्या निदर्शनास आले.

News18 Lokmat | Updated On: Sep 22, 2019 09:32 PM IST

मुलीशी अश्लील चाळे करत होता 'मास्तर', आईच्याच आले निदर्शनास

भुसावळ,22 सप्टेंबर: यावल शहरात गुरु-शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. न्यू व्यास नगरमध्ये आर्क फाउंडेशन या क्लासेमध्ये शिक्षकच आपल्या 11 वर्षीय मुलीशी अश्लील चाळे करताना चक्क मुलीच्या आईच्या निदर्शनास आले. त्या शिक्षकाविरोधात यावल पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

अभिषेक पाल (वय-28) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. अभिषेक पाल हा गणित विषयाचा शिक्षक असून तो न्यू व्यास नगरमध्ये आर्क फाउंडेशन नावाने खासगी क्लासेस चालवतो. 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी उशीर झाला तिला मुलगी घरी आली नाही म्हणून तिची आई क्लासमध्ये गेली असता अत्यंत घृणास्पद प्रकार तिच्या निदर्शनास आला. मुलीची आई क्सासमध्ये गेली तेव्हा सर्व मुले बाहेर उभे होते आणि शिक्षक पाल हा आत मुलीशी अश्लील चाळे करत असल्याचे पीडितेच्या आईने पाहिले. यावेळी विद्यार्थ्यांना विचारले असता दररोज शिक्षक हा आम्हा सगळ्यांना बाहेर काढतो व नंतर तिला घेऊन स्वतंत्र शिकवतो असे सांगितले. त्यानंतर मुलीनेही अश्लील प्रकार करतो, असे सांगितले. शनिवारी सायंकाळी पीडित मुलीच्या आईने पोलिसांत अभिषेक पालविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आरोपी अभिषेक पाल याला पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा अटक केली आहे. पाल हा शहरातील पांडुरंग सराफ नगरमध्ये एकटाच राहतो. तो मुळचा मुंबई येथील असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपीने या आधीही काही मुलीशी अश्लील चाळे केले आहेत का, या दिशेने पोलिस आरोपीची चौकशी करत आहेत.

VIDEO:'लफडी केली तर सहन करा'; राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांची पवारांनी घेतली फिरकी

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 22, 2019 09:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...