वाराणसी, 29 मार्च : मध्य प्रदेशात (Madhya Pradesh News) दुसऱ्या दिवशीही काही अज्ञातांनी वयस्कर महिलेला आपल्या निशाणा बनवला. भेलूपूर पोलीस ठाणे हद्दीतील दुर्गाकुंड येथील बँक ऑफ बडोदाजवळ दोन बाईक स्वार तरुणांनी वयस्कर महिलेला लूटलं. दोन्ही तरुणांनी महिलेला सांगितलं की, योगीजींनी आदेश दिला आहे की, जे कोणी सोनं घालून आलं असेल त्यांचं सोनं काढून घ्या. यानंतर महिलेकडून बांगडी आणि अंगठी घेऊन चोर फरार झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी एका वयस्कर महिलेकडून पोलिसांच्या वेशात काही लोक आले व तिच्याकडून दीड लाखांची चेन घेऊन फरार झाले होते. या संबंधित वयस्क महिला मालती उपाध्याय यांनी सांगितलं की, आज गुरुधाम कॉलनीस्थित बँक ऑफ बडोदामधून पैसे काढण्यासाठी गेली होती. बँकेजवळ पोहोचताच काही तरुणांनी त्यांना अडवलं आणि म्हणाले की, योगीजींचा आदेश आहे की, ज्यांनी सोनं घालतं असेल ते काढून आणा.
हे ही वाचा-लग्नानंतर दुसरी रात्र 'लॉक अप'मध्ये, हळदी समारंभात केलेला कांड नवरदेवाच्या अंगलट
यानंतर दोघांनी महिलेच्या हातातून बांगड्या आणि सोन्याची अंगठी काढून घेतली. आणि फरार झाले. यानंतर महिलेने पोलिसात तक्रार केली. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत. पोलीस त्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासात असून लवकरच चोरांना पकडण्यात येईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Madhya pradesh, Thief