Lockdownमुळे बंद होती सिनेमा टॉकीज, दार उघडताच दिसला धक्कादायक प्रकार

Lockdownमुळे बंद होती सिनेमा टॉकीज, दार उघडताच दिसला धक्कादायक प्रकार

या काळात आत्महत्या आणि कौटुंबीक हिंसाचारात (Domestic violence) वाढ झाल्याची माहिती पुढे आली आहे. या दोन्ही घटनांमध्ये दुप्पट वाढ झाल्याचं उघड झालं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली 28 जून: लॉकडाउन संपल्यानंतर देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. मात्र अजुनही चित्रपट गृहांना परवानगी मिळाली नाही. त्यामुळे सर्व सिनेमा टॉकीज बंद आहेत. दिल्लीतल्या एका चित्रपट गृहात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वच्छता कर्मचारी जेव्हा आतमध्ये गेला तेव्हा त्याला धक्काच बसला. कारण त्या टॉकीजच्या गार्डने फाशी घेऊन आत्महत्या केल्याचं त्याला आढळून आलं. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

दिल्लीतल्या असफा अली रोडवर डिलाइट ही सिनेमा टॉकीज आहे. तिथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तिथल्या सेक्युरिटी गार्डने गळफास घेत आत्महत्या केल्याने खबळबळ उडाली. ही आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. त्याची हत्या करून शव सिनेमा हॉलमध्ये लटकविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

तर लॉकडाऊनमुळे गार्डला पगार वेळेवर मिळत नव्हता त्यामुळे तो त्रासला होता. त्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

लॉकडाऊनमुळे सगळे व्यवहार ठप्प झाले होते. छोटे व्यवहार बंद पडले हजारो कामगारांच्या नोकऱ्या गेल्या त्यामुळे नैराश्यात आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची माहिती दिली जातेय. या आत्महत्येसाठी प्रमुख 5 कारणं तज्ज्ञांनी सांगितली आहेत.

आर्थिक व्यवहार ठप्प पडल्याने अनेकांचं उत्पन्नाचं साधन बंद झालं. त्यामुळे उपजिविकेचं साधन गेल्याने नैराश्य आलं.

उत्पन्न बंद झाल्याने भविष्यात कसं होणार या चिंतेने अनेकांनी हे टोकाचं पाऊल उचललं.

कोरोनामुळे सगळीकडेच नैराश्याचं वातावरण होतं. या काळात हळव्या मनाची माणसं अधिकच खचली. त्यामुळे त्यांनी टोकाचा निर्णय घेतला.

चिंतेत आणखी भर! नाशकात हॉस्पिटल फुल्ल, 10 दिवसांत आढळले 1200 कोरोनाबाधित रुग्ण

अने कामगारांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं. त्यामुळे डोक्यावरचं कर्ज आणि कुटुंबांचा भार या ताणातून आत्महत्येचा मार्ग निवडला.

नैराश्य हा आजार आहे हे अनेकांना माहितच नसतं. त्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावे लागतात हेही अनेकांना माहितच नाही. त्यामुळे लोक त्या विषयी बोलत नाहीत. सगळं मनातच ठेवतात. त्यावर उपचार झाले तर अनेकांचे जीव वाचलीत असं डॉक्टरांचं मत आहे.

 

 

First published: June 28, 2020, 11:33 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading