चुरू, 29 मार्च : गेल्या काही दिवसांपासून लॉरेन्स बिश्नोई गँग चर्चेत आली होती. अशातच लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने ज्वेलर्सला खंडणी मागितल्याने खळबळ उडाली आहे. चुरू जिल्ह्यातील सुजनगड परिसरातून हे प्रकरण उघडकीस आले आहे. ज्वेलर्सला फोन करून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली. सोबत चाललात तर बरे होईल, अशी धमकी देखील यावेळी आरोपींनी दिली. यानंतर ज्वेलर्सने तत्काळ पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी सायबर टीम तयार करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
सुजानगडच्या आदर्श कॉलनीत राहणाऱ्या पवन सोनी यांना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास व्हॉट्सअॅप कॉल आला, त्यावर फोन करणाऱ्याने पैशाची मागणी करत सोबत चालण्याची धमकी दिली. यानंतर पीडित व्यक्तीने तात्काळ पोलीस ठाणे गाठून आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली. पीडित पवनचे सुजानगड येथील मुख्य बाजारपेठेत दागिन्यांचे दुकान आहे.
या प्रकरणी सुजानगड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक म्हणाले की, 26 मार्च रोजी पवन सोनी पोलीस ठाण्यात आले. खंडणीशी संबंधित तक्रार नोंदवत सुरक्षेची मागणी केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांकडून ज्वेलर्सच्या सुरक्षेसाठी रक्षक तैनात करण्यात आला आहे. पीडित पवन यांनी सांगितले की, 26 मार्च रोजी संध्याकाळी त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी नंबरवरून व्हॉट्सअॅप कॉल आला, ज्यामध्ये आरोपीने विविध गोष्टी सांगितल्या.
वाचा - खून का बदला खून! तंटामुक्त अध्यक्षाच्या पोरानं केली चुलत्याची हत्या
फोन करणार्याने स्वतःची ओळख रोहित गोदारा सांगितली
व्हॉट्सअॅप कॉलवर कॉलरने पवन यांना सांगितले की, मी बिकानेर जेलमधून रोहित गोदाराला बोलतोय. मला 2 कोटी रुपये हवे आहेत, सोबत चालला तर बरं होईल, अन्यथा आम्ही काय करू शकतो हे तुम्हाला माहिती आहे. आजच होय किंवा नाही उत्तर द्या, अन्यथा नुकसानास तयार रहा. त्यानंतर लगेचच पुन्हा फोन करून अशाच पद्धतीने धमकी देऊन पैशाची मागणी करण्यात आली. काही वेळाने व्हॉट्सअॅप मेसेज आला ज्यामध्ये दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली गेली.
रोहित गोदरा हा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सदस्य
ज्वेलर्सला धमकी देणारा रोहित गोदारा हा लॉरेन्स बिश्नोई टोळीचा प्रमुख सदस्य आहे. मूळचा बिकानेरचा रहिवासी असलेला रोहित हे गुन्हेगारी इतिहासातील मोठं नाव आहे. तो 2010 पासून गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय आहे. नुकत्याच झालेल्या गुंड राजू थेहतच्या हत्येची जबाबदारी रोहित गोदाराने फेसबुक पोस्टद्वारे स्वीकारली आहे. तेव्हापासून रोहित गोदाराचे नाव चर्चेत आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.