Home /News /crime /

सिस्टर हत्या प्रकरणात चर्चचे पाद्री आणि नन यांना जन्मठेप; एका चोराच्या साक्षीमुळं उलगडलं प्रकरण

सिस्टर हत्या प्रकरणात चर्चचे पाद्री आणि नन यांना जन्मठेप; एका चोराच्या साक्षीमुळं उलगडलं प्रकरण

केरळच्या सीबीआय विशेष न्यायालयाने (CBI Court) सिस्टर अभया हत्या प्रकरणात (Sister Abhaya murder case) दोन्ही आरोपींना दोषी ठरवलं असून त्यांना जन्मठेपेची (Life Imprisonment) शिक्षा सुनावली आहे.

    तिरुअनंतपुरम, 23 डिसेंबर: केरळच्या सीबीआय विशेष न्यायालयाने (CBI Court) सिस्टर अभया हत्या प्रकरणात (Sister Abhaya murder case) दोन्ही आरोपींना दोषी ठरवलं असून त्यांना जन्मठेपेची (Life Imprisonment) शिक्षा सुनावली आहे. तब्बल 28 वर्षांनी न्यायालयानं या हत्येचा (Murder) निकाल दिला आहे. सिस्टर अभयाच्या हत्येप्रकरणी कॅथेलिक चर्चचे फादर थॉमस कोट्टूर आणि नन सेफी यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. 1992 साली केरळमधील कोट्टायम येथे ही हत्या झाली होती. सीबीआय न्यायालयाने कलम 302 अंतर्गत कॅथेलिक फादर थॉमस कोट्टूर यांना जन्मठेपेसोबतच पाच लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचबरोबर पुरावे मिटवल्यामुळे त्यांना सात वर्ष तुरुंगवासाची आणि बेकायदेशीरपणे कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश केल्याबद्दल त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एका चोराच्या साक्षीनंतर हा निर्णय घेण्यात आला राजू नावाच्या प्रत्यक्षदर्शीची साक्ष या प्रकरणाचा मुख्य आधार बनली आहे. जेव्हा हा गुन्हा घडत होता तेव्हा राजू हा चोरी करण्यासाठी कॉन्व्हेंटमध्ये शिरला होता. त्यावेळी त्यानं घडलेला सर्व प्रकार पाहीला. तपास पथकानेदेखील या संबंधित चोराच्या साक्षीला आधार मानला आहे.  राजू चोरी करण्याच्या उद्देशाने तेथे गेला होता, तेव्हा त्यानं आरोपीला हत्या करताना पाहिलं आहे. (हे वाचा-भीषण दुर्घटना, यूरिया बनवणाऱ्या कंपनीत गॅस गळती, 2 अधिकाऱ्यांचा मृत्यू) नेमकं काय घडलं होतं 'त्या' दिवशी? 27 मार्च 1992 च्या सकाळी सिस्टर अभया कॉन्व्हेंटच्या डायनिंग हॉलमध्ये पाणी आणण्यासाठी गेली होती. तेव्हा तिनं थॉमस कोट्टूर आणि सिस्टर सेफी यांना आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचं पाहिलं. यानंतर फादर थॉमस कोट्टूर यांनी सिस्टर अभयावर शस्त्राने जोरदार हल्ला केला. ज्यामुळं अभया खाली पडली. यानंतर जोस आणि सेफीसमवेत फादर थॉमस यांनी सिस्टर अभयाचा मृतदेह कॉन्व्हेंटच्या (नन्सचा आश्रम) विहिरीत फेकला. आणि या हत्येला त्यांनी आत्महत्या असल्याचं भासवलं. परंतु राजूने दिलेल्या साक्षीमुळं दोघांची रवानगी तुरूंगात झाली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Murder

    पुढील बातम्या