Home /News /crime /

सिस्टर हत्या प्रकरणात अखेर चर्चचे पाद्री आणि नन दोषी; 28 वर्षांपूर्वीच्या त्या रात्री नेमकं काय घडलं होतं?

सिस्टर हत्या प्रकरणात अखेर चर्चचे पाद्री आणि नन दोषी; 28 वर्षांपूर्वीच्या त्या रात्री नेमकं काय घडलं होतं?

सिस्टर अभया हत्या प्रकरणात CBI विशेष न्यायालयाने फादर थॉमस कोट्टूर आणि नन सेफी यांना दोषी ठरवलं आहे. तब्बल 28 वर्षांनी न्यायालयाने हा निकाल दिला. आक्षेपार्ह अवस्थेत सापडल्यामुळे केली होती हत्या.

    तिरुअनंतपुरम, 22 डिसेंबर: केरळच्या तिरुअनंतपुरममधील सीबीआय विशेष न्यायालयाने सिस्टर अभया हत्या प्रकरणात दोन्ही आरोपींना दोषी ठरवलं आहे. तब्बल 28 वर्षांनी न्यायालयाने या हत्येचा निकाल दिला आहे. सिस्टर अभयाच्या हत्येप्रकरणी फादर थॉमस कोट्टूर आणि नन सेफी यांना दोषी ठरवण्यात आलं आहे. या दोघांच्या शिक्षेचा निर्णय बुधवारी होणार आहे. 27 मार्च 1992 ला कोट्टायममधील कॉन्व्हेंटच्या विहिरीत 21 वर्षीय सिस्टर अभयाचा मृतदेह सापडला होता. या घटनेला आता 28 वर्षे उलटून गेली आहेत. सुरुवातीला या प्रकरणाची नोंद आत्महत्या अशी केली होती. पण अॅक्शन कौन्सिलने दबाव टाकल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपण्यात आली होती. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने फादर थॉमस कोट्टूर यांना हत्येच्या प्रकरणात दोषी ठरवलं आहे. त्यांच्यावर हत्यासोबतच पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. तर नन सेफीला पुरावे मिटवण्याच्या आरोपाखाली दोषी ठरवलं आहे. नेमकं काय घडलं होतं 'त्या' दिवशी? 27 मार्च 1992 च्या सकाळी सिस्टर अभया कॉन्व्हेंटच्या डायनिंग हॉलमध्ये पाणी आणण्यासाठी गेली होती. तेव्हा तिनं थॉमस कोट्टूर आणि सिस्टर सेफी यांना आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचं पाहिलं. यानंतर फादर थॉमस कोट्टूर यांनी सिस्टर अभयावर शस्त्राने जोरदार हल्ला केला. ज्यामुळं अभया खाली पडली. यानंतर जोस आणि सेफीसमवेत फादर थॉमस यांनी सिस्टर अभयाचा मृतदेह कॉन्व्हेंटच्या (नन्सचा आश्रम) विहिरीत फेकला. आणि या हत्येला त्यांनी आत्महत्या असल्याचं भासवलं. परंतु प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या साक्षीमुळं दोघांची रवानगी तुरूंगात झाली. या प्रकरणात अनेक चढ उतार आले होते. अनेक वर्षांपासून हा खटला न्यायालयात चालू होता. सीबीआयने सुरुवातीला केलेल्या तपासात हे प्रकरण आत्महत्येचं नसून खुनाचं असल्याचं निदर्शनास आलं. परंतु सीबीआयला आरोपीपर्यंत पोहोचता आलं नाही. अखेर कोर्टाच्या हस्तक्षेपानंतर सीबीआयने फादर थॉमस, जोस पुथरिकायिल आणि सिस्टर सेफी यांना अटक केली. तथापि सीबीआय कोर्टाने जोसला 2018 मध्ये निर्दोष सोडलं होतं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Kerala

    पुढील बातम्या