रोकड किंवा संपत्ती नाही, पठ्ठ्याने थेट केली रस्त्याची चोरी! पोलीसही पडले बुचकळ्यात

या चोराला अटक करण्यात आली असली तरीही त्याच्या या कारनाम्यामुळे सर्वांना धक्काच बसला आहे. पोलीसही त्याच्या या हिंमतीमुळे आश्चर्यचकित झाले आहेत.

या चोराला अटक करण्यात आली असली तरीही त्याच्या या कारनाम्यामुळे सर्वांना धक्काच बसला आहे. पोलीसही त्याच्या या हिंमतीमुळे आश्चर्यचकित झाले आहेत.

  • Share this:
    बीजिंग, 11 डिसेंबर: चीनमधील (China) टेक्नॉलॉजीला जगभरात तोड नाही. चीनमधील लोकांचं मेहनती म्हणूनही कौतुक केलं जातं. याचबरोबर कोणत्याही गोष्टीची नक्कल करण्यात देखील चीनच्या नागरिकांचा कुणीही हात धरू शकत नाही. परंतु चीनमध्ये एका चोराने केलेल्या कारनाम्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या चोराने छोटीमोठी वस्तू किंवा पैसे चोरले नसून थेट रस्त्याच चोरला आहे. सध्या या चोरीची चीनमध्ये मोठी चर्चा होत असून या चोराने एका रात्रीत 800 मीटर लांबीच्या रस्त्याची चोरी केली आहे. महत्त्वाचे म्हणजे हा कच्चा रस्ता नसून सिमेंटच्या रोड आहे. यासंदर्भात चीनमधील माध्यमांमध्ये वृत्त प्रसारित झाले असून चीनच्या जिंआग्सू (Jiangsu provicnce) प्रांतातील या व्यक्तीने या रस्त्याची चोरी करून दगड बनवणाऱ्या कारखान्यात विकले आहे. पोलिसांनी या आरोपीला अटक (Arrest)  केली असून त्याने चोरीची कबुली दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 24 जानेवारीला या प्रांतातील  सानकेशू (Sankeshu)गावातील नागरिकांना या रस्त्याचा काही हिस्सा गायब (Road vanished) झालेला दिसला. परंतु त्यांना रस्त्याचे काम चालू असेल असे वाटले. परंतु त्यांना याचा संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. (हे वाचा-14 वर्षांच्या स्वरुपला होते पबजी गेमचे वेड, राहत्या घरात घेतला गळफास) त्यानंतर पोलीस तपासात हा रस्ता चोरीला गेल्याचे समोर आले. सोशल मीडियावर या चोरीची मोठी चर्चा होत असून यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. गरिबीमुळे या व्यक्तीला इनोव्हेटिव्ह बनवलं तसंच त्याला एकट्याला हा रस्ता बनवण्याची शिक्षा दिली जावी, अशा आशयच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर येत आहेत. (हे वाचा-‘प्रिय चोरा', गावकऱ्यांनी चोरी करणाऱ्याला लिहिलं इमोशनल पत्र...) दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या या चोरांचं नाव झू (Jhu) असं आहे. या रस्त्यावरून कुणीही प्रवास करत नसल्याने आपण हा रस्ता खोदून याची चोरी करण्याचे ठरवल्याचे झू याने पोलिसांना सांगितले. त्याने या रस्त्यावरील काँक्रीट दगड बनवणाऱ्या कारखान्यात विकले. त्याने चोरी करून विकलेल्या 500 टन काँक्रीटच्या बदल्यात 5 हजार युआन म्हणजेच भारतीय चलनात 51 हजार रुपये मिळवले होते.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: