मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Shocking! बापाच्या त्या सवयीमुळे मुलं वैतागले; हातातल्या कड्याने मारून मारून केली हत्या

Shocking! बापाच्या त्या सवयीमुळे मुलं वैतागले; हातातल्या कड्याने मारून मारून केली हत्या

मुलांनी बापाचीच हत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मुलांनी बापाचीच हत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मुलांनी बापाचीच हत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

धमतरी, 27 सप्टेंबर : धमतरीतील (Chattisgarh News) कुरुद पोलीस ठाणे हद्दीत एक धक्कादायक वृत्त (Shocking News) समोर आलं आहे. दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांची हत्या केली. या मुलांनी अत्यंत निर्दयीपणे विट आणि आपल्याच हातातील कड्याने त्यांची हत्या (Crime News) केली. या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जोरातराइ येथील अशोक साहू गावातील पंच होते, मात्र त्यांना दारूचं व्यसन होतं. त्यांच्या दारूच्या सवयीमुळे मुलं त्रस्त झाली होती. त्यामुळे दोघांनी जन्मदात्या वडिलांची हत्या (Killed Father) केली. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही मुलांना अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.

आरोपी मुलं 20 ते 22 वर्षांची आहे. रायपूरमध्ये ट्रक मॅकेनिकमध्ये काम करतात. आज सकाळी मृत व्यक्तीने दारूच्या नशेत आपल्या बाइकची तोड-फोड केली होती. मुलांनी त्यांची समजूत काढली तर ते मुलांनाच मारू लागला. भांडत असताना ते घरासमोरील तलावात गेले. शेवटी मुलांनी आपल्या प्रत्युत्तर देताना बापाला मारहाण सुरू केली. मुलांनी बापाला विट आणि हातातील कड्याने इतकं मारलं की, यातच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर मुलांनी बापाचा मृतदेह तलावात फेकून दिला. पोलिसांना याबाबत सूचना मिळताच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा-मोठ्या दीराने केली वहिनी व भावाची हत्या; कारण वाचून अंगावर काटा उभा राहील

अंत्य संस्कारासाठी कुटुंबीयांनी मुलांना सामील करण्याची मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणात परवानगी देण्याबाबत विचार करणार असल्याचं सांगितलं जात आहे. कुटुंबाची आर्थिक स्थिती सामान्य असून मृत व्यक्तीजवळ शेती ही आहे. याशिवाय ते गावाचे पंचदेखील होते.

First published:

Tags: Chattisgarh, Crime news, Murder