मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

OMG! आईच्या मृतदेहासोबत 2 वर्षांपासून राहत आहेत 4 मुलं, नेमका काय आहे प्रकार

OMG! आईच्या मृतदेहासोबत 2 वर्षांपासून राहत आहेत 4 मुलं, नेमका काय आहे प्रकार

56 वर्षांच्या लारिंडा जॉली असं या मृत महिलेचं नाव आहे. 21 ऑक्टोबर रोजी हा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला.

56 वर्षांच्या लारिंडा जॉली असं या मृत महिलेचं नाव आहे. 21 ऑक्टोबर रोजी हा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला.

56 वर्षांच्या लारिंडा जॉली असं या मृत महिलेचं नाव आहे. 21 ऑक्टोबर रोजी हा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला.

नवी दिल्ली, 01 नोव्हेंबर : आईच्या मृतदेहासोबत मुलं राहात असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 4 ते 5 दिवस किंवा महिनाभर नाही तर तब्बल 2 वर्ष ही मुलं आईच्या मृतदेहासोबत घरात राहत होते. अमेरिकेतून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. टेनेसी इथे एका महिलेचा मृतदेह 2 वर्षांनी बेडवरून ताब्यात घेतला आहे. हा मृतदेह पूर्णपणे खराब झाला होता. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या महिलेसोबत 2 वर्ष घरात मुलं राहात होते. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

56 वर्षांच्या लारिंडा जॉली असं या मृत महिलेचं नाव आहे. 21 ऑक्टोबर रोजी हा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला. कपड्यांच्या ढिगाऱ्याखाली बेडवर हा मृतदेह लपवण्यात आला होता. या घरासाठी नोटीस देण्यासाठी आलेल्या एका कर्मचाऱ्यामुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.

लारिंडा यांचा भाऊ अँथनी जॉली याने दिलेल्या माहितीनुसार महिलेचा मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता. केवळ सांगाडा उरला होता. या महिलेचा मृत्यू 2 वर्षांहून अधिक काळ आधी झाला असावा. अँथनीने आपल्या भाचीला याबाबत विचारणा केली असता धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हे वाचा-चेष्टा मस्करी अती झाली, मुंबईच्या रस्त्यावर मित्रानेच केला मित्राचा खून

लारिंडा यांना चार मुलं आहेत. पण ही चारही मुलांची मानसिक स्थिती ठिक नसल्याची माहिती मिळाली आहे. भावाने माहितीनुसार दोन वर्षांपासून आईच्या मृतदेहासोबत ते 2 वर्ष राहिले आहेत. तर भाचीकडे विचारणा केली असता भाचीने आई सध्या झोपली आहे ती बोलू शकत नाही अशी उत्तर देते. प्रत्येक वेळी हे उत्तर आल्यावर काहीतरी गडबड आहे असं वाटलं आणि त्यांनी तपासणी केली. पोलिसांनी या घटनेची दखल घेतल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे.

First published:

Tags: Viral news