Home /News /crime /

आधी धर्मपरिवर्तन अन् मुलांच्या भविष्याची चिंता; निवृत्त IRS अधिकाऱ्याची आत्महत्या

आधी धर्मपरिवर्तन अन् मुलांच्या भविष्याची चिंता; निवृत्त IRS अधिकाऱ्याची आत्महत्या

त्यांनी सहा पानी सुसाइड नोट लिहिली असून यात अनेक खुलासे केले आहेत.

    जयपूर, 19 जानेवारी : राजस्थानमधीन (Rajasthan News) जयपुरमधील एका निवृत्त IRS अधिकाऱ्याने आपल्याच फॅक्टरीत आत्महत्या (IRS officer Suicide) केल्याचं वृत्त समोर आलं आहे. IRS अधिकारी आपल्या मुलांची लग्न न झाल्यामुळे मानसिक (Mental Stress) तणावात होता. अधिकाऱ्याच्या मृतदेहाशेजारी एक सुसाइड नोटदेखील सापडली आहे. यात मुलं-मुलींची लग्न न झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. सूचना मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्याने धर्म परिवर्तन केलं होतं. शंकर लाल जैन (64) हे जयपुरमधील इन्कम टॅक्स अधिकारीच्या पदावरुन निवृत्त झाले होते. रीको येथीस इंडस्ट्रीयल भागात त्यांची श्याम ट्रेडर्सची फॅक्टरी आहे. दोन दिवसांपासून ते या फॅक्टरीतच थांबले होते. बुधवारी सकाळी कामगार तेथे कामासाठी आले तर ऑफिस बंद होतं. यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत सूचना दिली. पोलिसांच्या टीमने ऑफिसरचं दार तोडून आत प्रवेश केला. तर शंकर लाल जैन यांचा मृतदेह बेडवर पडला होता. शेजारी सल्फास गोळ्यादेखील होत्या. पोलिसांनी सांगितलं की, दोन दिवसांपासून ते फॅक्टरीत थांबले होते आणि कुटुंबीयांच्या संपर्कात नव्हते. सूचना मिळाल्यानंतर कुटुंबीयही घटनास्थळी पोहोचले. हे ही वाचा-नागपूर हादरलं, 2 मुलांची आणि पत्नीची हत्या करून पतीने केली आत्महत्या! सुसाइड नोटमध्ये लिहिलं की... मृतदेहाशेजारी मिळालेल्या सुसाइड नोटवरुन शंकर लाल यांनी आपल्या मुलांची लग्न न झाल्यामुळे त्रस्त असल्याचं समोर आलं. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. चार पानी सुसाइड नोटमध्ये लिहिलं आहे की, आता संसार रुची राहिली नाही. मुली मला माफ करा, मी चांगला बाप होऊ शकलो नाही. माझी जबाबदारी मी पूर्ण करू शकलो नाही. त्यांचा एक मुलगा आणि मुलगी डेंटिस्ट आहे तर एक एसएमएसमध्ये आहे. पोलिसांनी सांगितलं की, शंकर लाल जैन यांनी धर्म परिवर्तन केलं होतं. आधी ते आपलं नाव एसएल चंदेल लिहित होते. त्यांच्या ऑफिसमधून अनेक धार्मिक पुस्तकं सापडली आहेत. ते गुजरात, अलवर आणि बिकानेरमध्येही पोस्टेड होते.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Mental health, Rajasthan, Suicide

    पुढील बातम्या