• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • धक्कादायक! लहान मुलांची हत्या करून रक्त प्यायचा हा आरोपी; लोकांनी दिली भयंकर शिक्षा

धक्कादायक! लहान मुलांची हत्या करून रक्त प्यायचा हा आरोपी; लोकांनी दिली भयंकर शिक्षा

काही दिवसांपूर्वीच मास्टेन वंजाला (Masten Wanjala) याला अटक करण्यात आली. जुलैमध्ये दोन मुलं बेपत्ता झाल्यानंतर त्याचा खरा चेहरा समोर आला

 • Share this:
  नवी दिल्ली 19 ऑक्टोबर : एका सीरियल किलरचं (Serial Killer) हैराण करणारं कृत्य समोर आलं आहे. या व्यक्तीनं लहान मुलांना लक्ष्य केलं होतं. हा व्यक्ती लहान मुलांची हत्या (Child Serial Killer) करून त्यांचं रक्त पित असे. एक दिवस हा आरोपी लोकांच्या तावडीत सापडला आणि लोकांनी त्याला जबर मारहाण करत हत्या केली. या सीरियल किलरनं मान्य केलं होतं, की आतापर्यंत त्यानं 10 मुलांची हत्या केलेली आहे. हत्येनंतर तो लहान मुलांचं रक्त पित असे. Call Girl च्या सप्लायवरून हाणामारी, आवडलेली सोडून दुसरीच तरुणी पाठवल्याने राडा मास्टेन वंजाला नावाच्या हा सीरियल किलर दोन दिवसाआधीच तुरुंगातून फरार झाला होता. यानंतर केन्यामध्ये पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, पोलिसांआधी लोकांनीच त्याला शोधून काढलं आणि मारहाण करून त्याचा जीव घेतला. जेव्हा पोलिसांनी या आरोपीला अटक केली होती, तेव्हा त्यानं मान्य केलं होतं की तो लहान मुलंनी विषारी पदार्थ देऊन आधी बेशुद्ध करत असे आणि नंतर त्यांची हत्या करत असे. मिररच्या रिपोर्टनुसार, ही घटना केन्याच्या नेरोबी येथील आहे. काही दिवसांपूर्वीच इथे राहणाऱ्या मास्टेन वंजाला (Masten Wanjala) याला अटक करण्यात आली. जुलैमध्ये दोन मुलं बेपत्ता झाल्यानंतर त्याचा खरा चेहरा समोर आला. पोलीस त्याला कोर्टात घेऊन जात असतानाच तो फरार झाला. जन्म आणि मृत्यू एकत्रचं! 25 व्या मजल्यावरुन पडून दोन जुळ्या भावांचा दुर्देवी अंत पोलीस तपासात समोर आलं, की वंजाला हा 12 ते 15 या वयोगटातील मुलांना लक्ष्य करत असे. या मुलांनी तो विषारी पदार्थ देवून बेशुद्ध करत असे. कधीकधी तर तो या मुलांची सरळ हत्या करत असे. यानंतर त्यानं काही मुलांचं रक्तही प्यायचा. लहान मुलांना आपण फुटबॉल कोच असल्याचं सांगत तो आपल्या जाळ्यात अडकवत असे.
  Published by:Kiran Pharate
  First published: