मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

OMG! 9 वर्षीय बालक करत होता अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक खुलासा

OMG! 9 वर्षीय बालक करत होता अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल, पोलिसांच्या चौकशीत धक्कादायक खुलासा

Child Pornography Cases : हा मुलगा एका नामांकित शाळेत शिकतो आणि तो फक्त 9 वर्षांचा आहे. एवढेच नाही तर, मुलाने अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यासाठी वडिलांच्या मोबाईलचा वापर केला. त्यासाठी त्याने ई-मेल आयडीही तयार केला होता.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 04 डिसेंबर : दिल्ली पोलिसांनी चाइल्ड पोर्नोग्राफीविरोधात (Child Pornography) पॅन दिल्ली ऑपरेशन सुरू केले आहे. त्याला 'ऑपरेशन मासूम' (Operation Masoom) असे नाव देण्यात आले आहे. त्याचबरोबर या कारवाईदरम्यान अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. सोशल मीडियावर अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी निजामुद्दीन पोलीस ठाण्यात 9 वर्षांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी मुलाची त्याच्या घरी जाऊन चौकशी केली आहे.

या प्रकरणाबाबत दिल्ली पोलिसांकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. तथापि, दक्षिण-पूर्व जिल्ह्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, आरोपी मुलगा दक्षिण दिल्लीतील एका नामांकित शाळेत शिकतो आणि तो फक्त 9 वर्षांचा आहे. एवढेच नाही तर, मुलाने अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यासाठी वडिलांच्या मोबाईलचा वापर केला. त्यासाठी त्याने ई-मेल आयडीही तयार केला होता. मात्र, मुलाचे वडील कमी शिकलेले असल्यानं या मुलाकडे अश्लील व्हिडिओ कोठून आले, हे समजू शकलेले नाही.

अमेरिकन एनजीओच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

एनसीएमईसी या अमेरिकन एनजीओच्या तक्रारीवरून निजामुद्दीन पोलिस ठाण्यात मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुलाची चौकशी करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. काही काळापूर्वी मुलानं हा व्हिडिओ पाठवला होता. NCMEC सोशल मीडियावरील चाइल्ड पोर्नोग्राफीवर नजर ठेवते आणि असे प्रकरण समोर आल्यावर संबंधित देशाला कळवते. एनसीएमईसीनं या मुलाच्या प्रकरणाची माहिती एनसीआरबीला दिली आणि एनसीआरबीने ही माहिती दिल्ली पोलिसांना दिली. याप्रकरणी दिल्ली पोलीस तपास करत आहेत.

हे वाचा - Sitting on the Floor while Eating: जमिनीवर बसून जेवल्यामुळे आरोग्याला होतात इतके फायदे, वाचा जेवण्याची योग्य पद्धत

आतापर्यंत 97 जणांना अटक करण्यात आली आहे

स्पेशल सेलचे सायबर क्राईम युनिट आणि सर्व जिल्हा पोलिसांच्या सहकार्याने 'ऑपरेशन मासूम' राबविण्यात येत आहे. नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रन (NCMEC) सोबत संबंध असलेल्या नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) मार्फत बाल पोर्नोग्राफीशी संबंधित उल्लंघनाची तक्रार सायबर क्राईम युनिटला केली जाते. पॅन दिल्लीच्या आधारे विविध पोलिस ठाण्यांमध्ये 100 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले असून दोषींवर आवश्यक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत आतापर्यंत 97 जणांना अटक करण्यात आली आहे.

हे वाचा - PF खातेधारकांना मिळणार 1 लाखांचा फायदा, कसे काढू शकता पैसे? चेक करा

नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्स्प्लॉयटेड चिल्ड्रन (NCMEC) ही एक खाजगी आणि ना-नफा तत्त्वावर काम करणारी संस्था आहे. या संघटनेची स्थापना 1984 मध्ये संयुक्त राष्ट्र काँग्रेसने केली होती. संस्था यूएसए मध्ये स्थित आहे. संस्थेनं फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मशी करार केला आहे. जेव्हा जेव्हा त्यांना सोशल मीडियावर मुलांच्या संबंधात कोणतेही अश्लील साहित्य आढळतं, तेव्हा ते त्याला 'रेड फ्लॅग' देतात. ते अश्लील साहित्य अपलोड करणार्‍या वापरकर्त्याचा IP अ‌ॅड्रेस आणि इतर तपशील मिळवतात.

First published:

Tags: Crime news, Social media