मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

छोटा शकीलच्या नातेवाईकाचाच गेम; NIA च्या सुटकेसाठी तब्बल 50 लाखांत गंडवले

छोटा शकीलच्या नातेवाईकाचाच गेम; NIA च्या सुटकेसाठी तब्बल 50 लाखांत गंडवले

विशालने सलीम फ्रूटला सांगितले होते की, त्याची दिल्लीत बसलेल्या एका वरिष्ठ मंत्र्यासोबत ओळख आहे.

विशालने सलीम फ्रूटला सांगितले होते की, त्याची दिल्लीत बसलेल्या एका वरिष्ठ मंत्र्यासोबत ओळख आहे.

विशालने सलीम फ्रूटला सांगितले होते की, त्याची दिल्लीत बसलेल्या एका वरिष्ठ मंत्र्यासोबत ओळख आहे.

  • Published by:  News18 Desk
मुंबई, 8 ऑगस्ट : अंडरवर्ल्ड डॉन छोटा शकीलचा नातेवाईक सलीम फ्रूट याला फसवल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी कक्षाने केली. विशाल देवराज सिंग उर्फ ​​विशाल काळे असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. 50 लाखांची मागणी - सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशालने सलीम फ्रूटला सांगितले होते की, त्याची दिल्लीत बसलेल्या एका वरिष्ठ मंत्र्यासोबत ओळख आहे. तसेच ही ओळख असल्यामुळे त्याने सलीम फ्रूटला राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) चौकशीतून वाचवण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी त्याने सलीम फ्रूटकडे 50 लाखांची मागणी केली होती. याप्रकारे केली फसवणूक -  तसेच यानुसार, फ्रूटने विशाल काळेला 50 लाख रुपये दिले होते आणि त्यानंतर पुढील डीलसाठी फ्रूटला दिल्लीला बोलावले होते. त्यानंतर फ्रूटला काही दिवस दिल्लीत राहण्यास सांगितले होते आणि त्यानंतर तू येथून मुंबईला जा, एनआयए आता तुला अटक करणार नाही, असेही सांगितल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. आणखी दोन जणांना अटक -  याच प्रकरणी गुन्हे शाखेने आणखी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहेत. तसेच त्यांची नावे जाफर उस्मानी आणि पवन उरेजा असल्याचे सांगण्यात येत आहे. सलीम फ्रूट सध्या एनआयए कोठडीत -  छोटा शकीलचा मेव्हणा सलीम कुरैशीने मुंबईतील एका नामांकित बिल्डरला धमकी दिली होती. सलीम दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीसच्या नावाने धमकी दिली होती. तसेच त्याने बिल्डरकडे त्याच्या सुरु असलेल्या एका प्रोजेक्टमधील दोन फ्लॅटची डिमांड केलेली होती. संबंधित नामांकित बिल्डरने घाबरुन सलीमची ती मागणी पूर्ण केली होती. बिल्डरने आपल्या सुरु असलेल्या प्रोजेक्टमधून दोन फ्लॅट सलीमला दिले होते. पण त्यानंतर सलीमची आणखी हिंमत वाढली. त्याने पुन्हा बिल्डरला धमकी देण्यास सुरुवात केली. तो बिल्डरकडे संबंधित प्रोजेक्टमध्ये आर्धी पार्टनर्शीप मागू लागला. तो बिल्डरला यासाठी प्रचंड त्रास देत होता. हेही वाचा - संभाव्य मंत्र्यांसोबत फडणवीसांची डिनर डिप्लोमसी? नाराजांना शांत करण्याचं आव्हान अखेर एनआयएला याबाबतची माहिती मिळाली. विशेष म्हणजे एनआयएने त्याआधीच सलीम कुरैशी याच्याविरोधात डी कंपनीशी संबंधित आणि त्याच्या काळ्या कूकृत्यांप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, संबंधित प्रकरणाच्या तपासानंतर एनआयएने सलीमला ताब्यात घेत त्याची चौकशी केली. त्यानंतर त्याला अटक केली. सध्या सलीम फ्रूटला एनआयए कोर्टाने 17 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.
First published:

Tags: Mumbai, Mumbai crime branch, Nia

पुढील बातम्या