भरधाव कारनं दुचाकीस्वाराला नेलं फरफटत, अंगावर काटा आणणारा CCTV VIDEO

भरधाव कारनं दुचाकीस्वाराला नेलं फरफटत, अंगावर काटा आणणारा CCTV VIDEO

भरधाव कारची दुचाकीला धडक, कार चालकानं दुचाकीस्वाराला नेलं फरफटत.

  • Share this:

रायपूर, 15 डिसेंबर: भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याचा धक्कादायक सीसीटीव्ही समोर आला आहे. या दुर्घटनेमध्ये कारचालक दुचाकीस्वाराला फरफटत घेऊन जात असल्याचं दिसत आहे. ही घटना छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूर इथली असल्याची माहिती मिळत आहे. रायपूरमधील रस्त्यावर रात्री उशिरा हा प्रकार घडला अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रात्री बाईकवरु दोन जण जात असताना अचानक भरधाव कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर दोन्ही दुचाकीस्वार खाली कोसळले. त्यातील एक जण गाडीच्या खाली आला तर दुसऱ्याला किरकोळ मुका मार लागला होता. हे कार चालकाच्या लक्षात आलं. त्यावेळी त्याने गाडी एका क्षणासाठी थांबवली आणि क्षणातच वेग वाढवून त्याने दुचाकीस्वाराला चिरडत काही अंतरापर्यंत नेलं. दुर्घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर हा कार चालक दारू पिऊन गाडी चालवत असल्याच्या चर्चा रंगत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कार चालकाल सीसीटीव्हीच्या आधारे ताब्यात घेण्यात आलं असून सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे. गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालकावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेनं या दुर्घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओ नीट पाहिला तर लक्षात येईल मागू येणाऱ्या भरधाव कारनं बाईकस्वारांना धडक दिली आणि अपघात घडला. बाईकस्वार आपल्या कारखाली आल्याचं लक्षात येताच क्षणभर कार थंबवण्यात आली मात्र चालकानं कारचा वेग वाढवला आणि दुचाकीस्वाराची मदत करण्याऐवजी त्याला काही अंतरापर्यंत फरफटत नेलं. कार चालकानं भीतीपोटी हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितल्याची माहिती मिळत आहे. अपघाताचा नेमकं कारण मात्र समोर आलं नाही. कार चालक नेशेत होता की कारवरचं त्यावेळी नियंत्रण सुटल्यानं हा प्रकार घडला याबाबत पोलिसांनी अजून कोणतीही माहिती दिली नाही. पोलिसांकडून कार चालकाची चौकशी सुरू आहे. तर गंभीर जखमी असलेल्या दुचाकीस्वारावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Published by: Akshay Shitole
First published: December 15, 2019, 10:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading