मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /काळी जादू शिकण्यासाठी शिष्याचं महाभयंकर कृत्य, गुरुची हत्या करून प्यायला रक्त आणि...

काळी जादू शिकण्यासाठी शिष्याचं महाभयंकर कृत्य, गुरुची हत्या करून प्यायला रक्त आणि...

शिष्याला असं वाटत होतं की, काळ्या जादूची शक्ती मिळवण्यासाठी त्याला माणसाचं रक्त प्यावं लागेल. त्यामुळे जेव्हा गुरू काळी जादू करत होता तेव्हा त्याने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचा खून केला.

शिष्याला असं वाटत होतं की, काळ्या जादूची शक्ती मिळवण्यासाठी त्याला माणसाचं रक्त प्यावं लागेल. त्यामुळे जेव्हा गुरू काळी जादू करत होता तेव्हा त्याने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचा खून केला.

शिष्याला असं वाटत होतं की, काळ्या जादूची शक्ती मिळवण्यासाठी त्याला माणसाचं रक्त प्यावं लागेल. त्यामुळे जेव्हा गुरू काळी जादू करत होता तेव्हा त्याने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचा खून केला.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  धमतरी, 04 फेब्रुवारी : अंधश्रद्धा आणि काळ्या जादूमुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. धनाच्या लालसेपोटी काळी जादू करून अनेकांच्या हत्या झाल्याच्या घटना घडतात. अशीच एक दुर्दैवी घटना छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात घडली आहे. या धक्कादायक घटनेमध्ये एका तरुणाने स्वतःच्या गुरूंचा खून केला आहे. तंत्रविद्या शिकणाऱ्या एका तरुणाने गुरूकडून तांत्रिक सिद्धी मिळवण्यासाठी स्वतःच्या गुरूचा बळी दिला आहे. तो इतक्यावरच थांबला नाही, तर त्याला मारल्यानंतर त्याने मृत गुरूचं रक्तही प्यायलं. या धक्कादायक घटनेनंतर खळबळ उडाली आहे.

  मिळालेल्या माहितीनुसार, धमतरी जिल्ह्यात तांत्रिक विद्या शिकणाऱ्या 25 वर्षीय तरुणाला त्याच्याच गुरूची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. गुरूची हत्या केल्यानंतर त्याला काळ्या जादूचे सर्व ज्ञान मिळेल, असं त्या तरुणाला वाटत होतं, म्हणून त्याने हे कृत्य केलं होतं. रौनक सिंग छाबरा उर्फ मन्या चावला असे अटकेतील आरोपीचं नाव आहे. शुक्रवारी याबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने सांगितलं की, जादूटोण्यासाठी काळ्या जादूचा वापर केला जातो. छत्तीसगडमधील जादू-टोणा प्रतिबंधक कायदा 2005 अंतर्गत काळी जादू करणं हा दंडनीय गुन्हा आहे.

  हेही वाचा : 22 वेळा तिने...; बेडरूममध्ये Girlfriend च्या 'त्या' कृत्यामुळे सीरिअल किलर Boyfriend चा गेला जीव

  दरम्यान, रौनक सिंह छाबरा उर्फ मन्या चावला याला गुरुवारी गुरूच्या हत्येप्रकरणी ताब्यात घेण्यात आलं. त्याच्या गुरुचा अर्धवट जळालेला मृतदेह त्याच दिवशी मगरलोड पोलीस ठाण्यांतर्गत परिसरात सापडला होता. गुरू मृत बसंत साहू (50) यांच्याबरोबर शेवटचा मन्या चावला दिसला होता, त्यामुळे त्याला अटक करण्यात आली, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली.

  अटक केल्यानंतर चावलाने पोलिसांना सांगितलं की, तो बसंत साहू यांच्याकडून काळी जादू शिकत होता आणि त्याला स्वत: ही कला करून पाहायची होती. चावलाला असं वाटत होतं की काळ्या जादूची शक्ती मिळवण्यासाठी त्याला माणसाचं रक्त प्यावं लागेल. त्यामुळे जेव्हा गुरू काळी जादू करत होता तेव्हा त्याने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचा खून केला. मग तो त्याचं रक्त प्यायला. नंतर त्याने आपल्या गुरूचा मृतदेह जाळून टाकला. पण, त्याचं बिंग फुटलं आणि प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. आता पोलीस या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी करत आहेत.

  First published:

  Tags: Crime