वडिलांनीच बाहेर काढला चिमुकलीचा मृतदेह, समोर आली धक्कादायक INSIDE STORY

वडिलांनीच बाहेर काढला चिमुकलीचा मृतदेह, समोर आली धक्कादायक INSIDE STORY

मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी वडिलांनी हट्ट धरला आणि...

  • Share this:

छत्तीसगड, 24 जुलै : मामाच्या घरात राहणाऱ्या एका 7 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या मामा आणि त्याच्या जवळच्या धाकट्या भावावर खुनाचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी वडिलांकडून करण्यात आली आहे. या प्रकरणात कोर्टाच्या आदेशानंतर पोलिसांनी पहाटे दहाच्या सुमारास डॉक्टर आणि न्यायिक अधिकाऱ्यांच्या टीमच्या उपस्थितीत मृतदेह कब्रिस्तानमधून बाहेर काढला. शवविच्छेनासाठी बाहेर काढला आणि नंतर पुन्हा पुरला.

धक्कादायक म्हणजे, पीडितेचे वडील दुकालू दास महंत हे विद्युत विभागात काम करतात. त्यांची मुलगी दीपिका (खुशी) 7 वर्षांची आहे. होळीच्या 4 दिवस अगोदर दुकालू त्यांच्या कुटुंबासह सासरी निघाले होते. दरम्यान, दीपिकाची आजी आणि इतर सदस्य रायगड स्थानकात उतरले, तर दीपिकासुद्धा आजीसोबत रायगड स्थानकात उतरली.

या दरम्यान, दीपिकाच्या मामाने 10 जुलै रोजी तिच्या वडिलांना मुलीची प्रकृती खालावली असल्याची माहिती दिली. तिला रक्ताच्या उलट्या होत असल्याचंही मामाने वडिलांना सांगितलं. त्यानंतर, वडिल घरी येताच मुलीच्या मृत्यूची माहिती समोर आली. तिच्यावर अंत्यसंस्कार केले असल्याचंही मामाने सांगितलं. यावर वडिलांच्या पायाखालची जमिन हादरली.

यावर वडिलांनी चौकशीची मागणी करत गुरुवारी नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत आरोग्य विभाग आणि पोलीस पथकाने मृतदेह खोदून पोस्टमार्टम केला. शवविच्छेन अहवालाच्या आधारे पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेची माहिती वाऱ्याच्या वेगाने संपूर्ण परिसरात पसरली. त्यामुळे घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे. मुलीचा शवविच्छेदन रिपोर्ट आल्यानंतर मृत्यूचं गूड उकलेल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. पण आपली हसती-खेळती लेक अशा प्रकारे गेल्यामुळे वडिलांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: July 24, 2020, 11:26 PM IST
Tags: crime news

ताज्या बातम्या