पतीनेच तयार केला पत्नीचा परपुरुषासोबत अश्लील व्हिडिओ आणि...

पैशांसाठी दाम्पत्याचं लज्जास्पद कृत्य, तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लुटलं.

News18 Lokmat | Updated On: Oct 26, 2019 12:55 PM IST

पतीनेच तयार केला पत्नीचा परपुरुषासोबत अश्लील व्हिडिओ आणि...

राजनांदगाव, 26 ऑक्टोबर: नवऱ्यानेच स्वत:च्या बायकोचा तरुणासोबत अश्लील व्हिडिओ तयार करून व्हायरल करण्याची धमकी तरुणाला दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा नवरा-बायकोचा पैसे उकळण्यासाठी प्लॅन असल्याचं समजतं आहे. दोघांनी मिळून तरुणाकडून 6 लाख रुपये उकळले होते. मात्र पैशाची हाव सुटल्यानं यांनी पुन्हा तरुणाला पैशांसाठी ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. तरुणाने पोलीस स्टेशन गाठलं आणि हा सगळा प्रकार पोलिसांसमोर उघड केला. छत्तीसगडमधील राजनांद गाव इथे हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकरणी आरोपी नवरा-बायको दोघांनाही पोलिसांनी तातडीनं बेड्या ठोकल्या आहेत.

आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि...

डोंगरगढ परिसरात हनी ट्रॅपसारखं एक प्रकरण समोर आलं आहे. महिलेनं तरुणाला आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्लॅन केला. त्यानंतर महिलेनं तरुणाला लग्नाचं खोटं आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. तरुण आणि महिलेचा व्हिडिओ आणि फोटो काढून तरुणाला पैशांसाठी ब्लॅकमेल करण्याचा प्लॅन महिला आणि तिच्या पतीनं रचला. त्यानंतर ठरलेल्या प्लॅननुसार महिलेनं तरुणाला बोलवून त्याच्यासोबत अश्लील प्रकार केला आणि पतीनं तो लपून कॅमेऱ्यात कैद केला.

तरुणाला असं केलं ब्लॅकमेल

महिला आणि तिच्या नवऱ्यानं मिळून तरुणाला व्हिडिओ आणि फोटो वायरल करून बदनाम करण्याची धमकी देऊ लागले. सुरुवातीला त्यांनी 10 लाख रुपयांची मागणी केली. चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार त्या दोघांनीही आधी तरुणाकडून 6 लाख रुपये उकळले होते. त्यानंतर आणखी पैशांची मागणी करायला लागल्यानंतर मात्र तरुणाने पोलिसांत तक्रार दाखल केली. तरुणाने घडलेला प्रकार सांगितला. तरुणाने दिलेल्या जबाबावरुन तक्रार दाखल करुन घेत पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या पतीला अटक केली आहे.

Loading...

क्यार वादळामुळे सिंधुदुर्गात मोठं नुकसान, पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: crime
First Published: Oct 26, 2019 12:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...