Home /News /crime /

कलेक्टरनं कार्यालयातच महिलेवर केला बलात्कार, पतीच्या नोकरीची घातली भीती आणि...

कलेक्टरनं कार्यालयातच महिलेवर केला बलात्कार, पतीच्या नोकरीची घातली भीती आणि...

या प्रकरणी पीडितेनं माजी जिल्हाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.

    रायपूर, 04 जून : पतीला नोकरीवरून निलंबित करण्याची भीती आणि कामाचं आमिष दाखवून माजी जिल्हाधिकाऱ्यानं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील जांजगीर चंपा जिल्ह्यात हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. महिलेनं या माजी जिल्ह्याधिकाऱ्यावर अश्लील भाषेत मेसेज, व्हिडीओ पाठवून बोलल्याचा आणि लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान या घटनेप्रकरणी पोलिसांनी तपास करून माजी जिल्हाधिकाऱ्यांविरोधात तक्रर दाखल केली आहे. माजी जिल्हाधिकारी जनक प्रसाद पाठक यांच्या विरोधात महिलेनं पोलिसांत तक्रार दाखल केली. एका सामाजिक संस्थेचे कामानिमित्तानं जिल्हाधिकाऱ्यांना ही महिला कार्यालयात भेटायला गेली होती. त्यावेळी तिच्याकडून मोबाईलनंबर घेऊन काम झाल्यानंतर फोन करेन असं सांगितलं. कामऐवजी या जिल्हाधिकाऱ्यांनी तिच्यासोबत अश्लील मेसेज पाठवणं, व्हिडीओ पाठवण्यास सुरुवात केली. हे वाचा-फसवणूक करणाऱ्या भाजप उपमहापौराने पोलिसांनाही गंडवलं, आयुक्तांनी केली कारवाई या पीडित महिलेचे पती सरकारी कार्यालयात काम करतात. त्यांना प्रमोशन देण्याचं प्रलोभन आणि या महिलेचं काम करण्याची अट पूर्ण करण्यासाठी पीडित महिलेनं त्यांना भेटावं यासाठी सातत्यानं तिला सांगण्यात आलं. पीडितेनं नकार दिल्यास पतीला नोकरीवरून निलंबित करेन अशी धमकी या पीडितेला देण्यात आली. कामानिमित्तानं पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेली असताना कार्यालयातच तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेनं केला आहे. ही घटना 15 मे रोजी घडली असून या प्रकरणी पीडितेनं पोलिसांनी फोनमधील सर्व मेसेज आणि व्हिडीओही दाखवल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी माजी जिल्हाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. हे वाचा-चुलत भावावर जडला जीव, पत्नीने मास्टर माईंड बनून पतीचा केला मर्डर संपादन- क्रांती कानेटकर
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    पुढील बातम्या