Home /News /crime /

हद्दच झाली! स्वत:च्या अपहरणाचा ड्रामा करुन वडिलांकडे मागितले 30 लाख, कारण ऐकून चक्रावाल

हद्दच झाली! स्वत:च्या अपहरणाचा ड्रामा करुन वडिलांकडे मागितले 30 लाख, कारण ऐकून चक्रावाल

पैशांसाठी स्वत:च्याच अपहरणाचं नाटक (Fake Kidnapping) रचून फसवण्याच्या घटना तुम्ही ऐकल्या किंवा चित्रपटांत पाहिल्या असतील. चेन्नईमध्ये प्रत्यक्षात अशी घटना नुकतीच घडली आहे. थोडेथोडके नाही, त्याला त्याच्या वडिलांकडून 30 लाख रुपये उकळायचे होते

पुढे वाचा ...
चेन्नई, 19 जानेवारी: पैशांसाठी स्वत:च्याच अपहरणाचं नाटक (Fake Kidnapping) रचून फसवण्याच्या घटना तुम्ही ऐकल्या किंवा चित्रपटांत पाहिल्या असतील. चेन्नईमध्ये प्रत्यक्षात अशी घटना नुकतीच घडली आहे. स्वत:च्या वडिलांकडून पैसे उकळण्याकरता एका 24 वर्षांच्या तरुणानं हे अपहरण नाट्य रचलं होतं. या तरुणाला त्याच्या वडिलांकडून तब्बल 30 लाख रुपये उकळायचे होते. पण चेन्नई शहर पोलिसांनी (Chennai City Police) त्याचा सिकंदराबादमध्ये (Sinkadarabad) मागोवा घेतला, अत्यंत शिताफीनं त्याला पकडलं आणि त्याच्या वडिलांनी त्याच्याशी संपर्क साधल्यानंतर त्याला परत घरी आणलं. पी. के. कृष्ण प्रसाद असं या तरुणाचं नाव आहे. त्याला नंतर पोलिसांनी सूचना देऊन सोडून दिलं. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिले आहे. त्याने हे अपहरण नाट्य का रचलं असावं, या प्रश्नाचं उत्तर चक्रावून टाकणारं आहे. चेन्नईच्या वडापालिनीमध्ये राहणाऱ्या पेनसिलाया या 54 वर्षांच्या व्यावसायिकांच्या दोन मुलांपैकी पी. कृष्ण प्रसाद हा धाकटा मुलगा. कृष्ण प्रसादला एक शॉर्ट फिल्म शूट करायची होती. त्यासाठी त्याला पैसे हवे होते, अशी माहिती मिळाली आहे. हे वाचा-बॉयफ्रेंडने कॉल न उचलल्याने भडकली 12 वर्षीय गर्लफ्रेंड;रागात केला विचित्र प्रताप 14 जानेवारी रोजी पेनिसालाया यांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यांचा मुलगा आदल्या दिवशी एका स्थानिक शॉपिंग मॉलमध्ये गेला होता, तो परत आलाच नाही अशी तक्रार त्यांनी नोंदवली. कृष्ण प्रसादच्या फोन नंबरवरून त्यांना एक मेसेज आल्याचंही त्यांनी पोलिसांना सांगितलं. त्यांच्या मुलाचं अपहरण झालं आहे आणि जर तो त्यांना परत हवा असेल तर तब्बल 30 लाख रुपयांची रक्कम त्यांनी द्यावी अशी मागणी या मेसेजमधून करण्यात आली होती. इन्स्पेक्टर प्रवीण राजेश यांच्या नेतृत्वाखाली वडापालिनी पोलिसांनी या प्रकरणात लक्ष घातलं. त्यांनी या ‘अपहरणाच्या’ चौकशीसाठी एक टीमही नेमली. सायबर क्राईम विभागही पोलिसांच्या मदतीला आला. त्यांनी कृष्ण प्रसादचा मोबाईल ट्रेस करून तो तेलंगणातल्या सिकंदराबादमध्ये असल्याची माहिती मिळाली. चेन्नई पोलीस मग सिकंदराबाद शहरात पोहोचले आणि तिथल्या स्थानिक पोलिसांच्या मदतीने अखेर कृष्ण प्रसादची कृष्ण प्रसादच्याच तावडीतून ‘सुटका’ केली. हे वाचा-लातुरात तरुणाला जिवंत जाळलं; महिनाभरानं उलगडलं गूढ, भावजय ठरली मृत्यूचं कारण खरं तर स्वत:च्याच अपहरणाचं नाट्य रचणं हे काही नवीन नाही. गेल्या वर्षीच्या ऑगस्टमध्येही कृष्ण प्रसादसारखंच एक नाट्य घडलं होतं. लुधियानातील एका मुलीने अगदी क्षुल्लक कारणासाठी स्वत:च्याच अपहरणाचा बनाव केला होता. त्यामुळे तिचे पालक हवालदिल झाले होते. पोलीसही चक्रावले होते. शाळेनंतर शाळेबाहेर काही वेळासाठी मित्राला भेटण्यासाठी या मुलीनं हे नाटक केलं होतं. ही मुलगी सकाळी शाळेसाठी म्हणून घराबाहेर पडली ती दुपारी परतलीच नाही. त्यामुळे तिचे पालक काळजीत पडले. त्यांनी जवळच म्हणजे भामियान कालानम इथं राहणाऱ्या वर्गामित्राकडे चौकशी केली. आपलं पाच जणांनी मिळून अपहरण केलं आहे असं पोलिसांना सांगण्यासाठी तिनंच क्लासमेटला सांगितलं होतं. पण पोलीस तपासात बनाव उघड झाला. कारण कोणतंही असो, स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचून काही काळ जरी पालकांना या मुलांनी संकटात टाकलं ते पोलिसांच्या चातुर्यानं ते पकडले जातात यात शंका नाही
First published:

Tags: Crime, Crime news

पुढील बातम्या