मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /Free FIRE गेम खेळताना फसवणूक; 30 हजारांच्या वसुलीसाठी 10 वीचा मुलगा घरातून पसार

Free FIRE गेम खेळताना फसवणूक; 30 हजारांच्या वसुलीसाठी 10 वीचा मुलगा घरातून पसार

Online अभ्यासासाठी मुलाने वडिलांचा फोन घेतला होता. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता.

Online अभ्यासासाठी मुलाने वडिलांचा फोन घेतला होता. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता.

Online अभ्यासासाठी मुलाने वडिलांचा फोन घेतला होता. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता.

बरेली, 12 नोव्हेंबर : ऑनलाइन गेमचा (Online Game) फटका आता लहान मुलांसह त्यांच्या पालकांनाही सहन करावा लागत आहे. ज्याचं ताजं उदाहरण बरेलीमध्ये पाहायला मिळालं. येथे एका मुलासोबत फ्री फायर गेमचं अकाऊंट बनवण्याच्या अमिषाने 30 हजार रुपयांची फसवणूक (Online Fraud) झाली.

पैसे गेल्यानंतर घरातील सदस्यांना न सांगता हा मुलगा पैसे वसूल करण्यासाठी बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील हाजीपूरसाठी रवाना झाला. मुलगा बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. यानंतर मुलाला जीआरपीच्या मदतीने ट्रेनमधून ताब्यात घेण्यात आलं. (Cheating while playing free FIRE games A 10th grader passes out of the house for recovery of Rs 30000)

जाणून घ्या काय आहे प्रकरण?

याबाबत जीआरपीच्या प्रमुखांनी सांगितलं की, पंजाबमधील बठिंडा निवासी प्रीतम यांचा मुलगा जैसनप्रीतचं अपहरण करून असम एक्सप्रेसमधून घेऊन जात असल्याची सूचना मिळाली होती. यानंतर प्रीतमचा फोटो आणि आधार कार्डाच्या आधारावर शोध घेत त्याला रेल्वेस्टेशनवरुन ताब्यात घेण्यात आलं.

फ्री फायर खेळताना झाली होती मैत्री आणि मग फ्रॉड

जीआरपीने मुलाची चौकशी केली तर त्याने सांगितलं की, त्याचं अपहरण झालं नव्हतं. तर ऑनलाइन मोबाइल गेम फ्री फायर खेलताना त्याची मैत्री साहिल नावाच्या एका तरुणासोबत झाली. त्याने त्याच्याबद्दल माहिती दिली. एका मित्राने त्याला गेमचा आयडी देण्याच्या नावावर त्याच्याकडून 15-15 हजार रुपये दोन वेळा घेतले होते. वडिलांच्या पेटीएममधून त्याने ही रक्कम दिली होती. पैसे दिल्यानंतर साहिलने त्याला गेममध्ये ब्लॉक केलं. घरातल्यांना याबद्दल कळेल त्याआधीच तो पैसे घेण्यासाठी घरातून निघाला. ट्रेनमध्ये बसताच त्याने आपला मोबाइल स्वीच ऑफ केला.

हे ही वाचा-मित्राच्या वाढदिवसाला गेले अन्..; दुर्दैवी घटनेत जीवलगानं डोळ्यादेखत सोडला प्राण

मुलाने पुढे सांगितलं की, तो दहावीत शिकतो. अभ्यासासाठी त्याने वडिलांकडून मोबाइल घेतला होता. मात्र अभ्यास करण्याऐवजी तो मोबाइलमध्ये ऑनलाइन गेम खेळत होता. तब्बल दोन महिन्यांपासून तो ऑनलाइन गेम खेळथ होता. ऑनलाइन झालेले मित्र साहिलने त्याला फ्री फायर गेमचा आयडी, अत्याधुनिक हत्यार, महागडे कपडे आदी देण्याच्या नावावर पैसे घेतले होते. हे कपडे आणि हत्यारं गेम खेळणाऱ्या त्या कॅरेक्टरसाठी घेणार होता.

पुढे मुलाने सांगितलं की, त्याने घरातून निघताना सोबत 1200 रुपये, एक बॅग, मोबाइल चार्जिंगसाठी पॉवर बँक, हँड फ्री, चार्जर घेऊन सायंकाळी 7 वाजता निघाला होता. रात्री 2 वाजता तो तिकीट न काढला अवध आसाम स्पेशन ट्रेनमध्ये बसला. जैसनप्रीतने पुढे सांगितलं की,ट्रेनमध्ये एका टीसीने त्याच्याकडून 1000 रुपयांचा दंड वसूल केला, मात्र त्याला 700 रुपयांची पावती दिली.

First published:
top videos

    Tags: Online crime, Online fraud, Punjab