मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पहिल्या पत्नीकडून धोका म्हणून 90 दिवसात 3 लग्नांचा घाट; दोघींनीही मन मोडलं, शेवटी...

पहिल्या पत्नीकडून धोका म्हणून 90 दिवसात 3 लग्नांचा घाट; दोघींनीही मन मोडलं, शेवटी...

तरुणाला या सर्व गोष्टींचा खूप त्रास होत होता..शेवटी त्याने धक्कादायक निर्णय घेतला.

तरुणाला या सर्व गोष्टींचा खूप त्रास होत होता..शेवटी त्याने धक्कादायक निर्णय घेतला.

तरुणाला या सर्व गोष्टींचा खूप त्रास होत होता..शेवटी त्याने धक्कादायक निर्णय घेतला.

    उदयपुर, 17 जुलै : राजस्थानमधील (Rajasthan News) उदयपूरमधून एक हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. येथे एका व्यक्तीने 90 दिवसात (Three marriage) तीन लग्न केले. यादरम्यान दोन्ही पत्नी त्याला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत निघून गेल्या. तर एकीचा मृत्यू झाला. यामुळे दुखावलेल्या तरुणाने स्वत:ला संपवण्याचा निर्णय घेतला. त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या या सर्व घटनांमुळे तो नैराश्यात गेला होता. त्यामुळे रस्त्याशेजारील झाडाला गळफास घेत त्याने आत्महत्या केली. या घटनेबाबत माहिती मिळताच स्थानिकांनी गर्दी जमा केली. मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या दोन पत्नी त्याला सोडून गेल्यामुळे तो तणावात होता. स्थानिकांनी तरुणाला लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर पोलिसांना बोलावलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती खुर्द येथील निवासी असून त्याचं नाव खेमरा (42) आहे. मृत व्यक्ती रिक्षा चालवून कुटुंबाचं पालनपोषण करीत होता. पहिल्या पत्नीने सोडली साथ म्हणून 3 महिन्यात 3 लग्न... मृत खेमराजच्या मुलाने सांगितलं की, जेव्हा तो लहान होता तेव्हा त्याची आई दुसऱ्या व्यक्तीसोबत निघून गेली होती. ज्यानंतर काही दिवस खेमराजने लग्न केलं नाही. यानंतर तीन महिन्यात एक-एक करीत तीन लग्न केलं. ज्यापैकी एकीचा मृत्यू झाला. दोघीजणी दुसऱ्या व्यक्तीसोबत फरार... खेमराजच्या मुलाने सांगितलं की, दोघीजणी दुसऱ्या पुरुषासोबत फरार झाल्या. जेव्हापासून दोघी घरातून गेल्या तेव्हापासून खेमराज तणावात होते. कोणाशीही फार बोलत नव्हते. याच तणावातून त्यांनी जीव दिल्याचं खेमराजच्या मुलाने सांगितलं. पोलीस या प्रकरणात तपास करीत असून तपासाअंती नेमकं कारण समोर येईल, असं सांगितलं जात आहे.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Crime news, Rajasthan, Suicide

    पुढील बातम्या