मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

जेवायला चला सांगायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचा नातलगाकडून विनयभंग

जेवायला चला सांगायला गेलेल्या अल्पवयीन मुलीचा नातलगाकडून विनयभंग

डोळे झाकून विश्वास ठेवला त्यानेच धोका दिला, जेवायला बोलवण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

डोळे झाकून विश्वास ठेवला त्यानेच धोका दिला, जेवायला बोलवण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

डोळे झाकून विश्वास ठेवला त्यानेच धोका दिला, जेवायला बोलवण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Chandrapur, India
  • Published by:  Kranti Kanetkar

चंद्रपूर : नातेवाईकांवर डोळेझाकून विश्वास ठेवणं एका अल्पवयीन मुलीला चांगलंच महागात पडलं आहे. सुदैवानं मोठा अनर्थ टळला मात्र ती फसली. जेवायला चला असं बोलवण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोठ्या आईच्या बहिणीच्या पतीने विनयभंगाचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेची माहिती अल्पवयीन मुलीनं मोठ्या आईला दिली. त्यांनी तातडीनं पोलीस ठाणे गाठत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

ही धक्कादायक घटना चंद्रपुरातील बंगाली कॅम्प परिसरात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीवर वियनभंगाचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या अल्पवयीन मुलीच्या डोक्यावरचं आई-वडिलांचं छत्र लहानपणीच हरपलं. ती सध्या चंद्रपुरात आपल्या मोठ्या आईकडे रहाते. मोठ्या आईची बहीण आणि तिचा पत्नी इथे चंद्रपुरात उत्तर प्रदेशहून आले होते. या निमित्ताने जंगी जेवणाचा बेत ठरला.

हे वाचा-ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीला घरी सोडण्याचा केला बहाणा; आधी पाजली दारू मग मित्रांना बोलावून..

जेवण तयार झालं आहे जेवायला चला हे सांगण्यासाठी त्यांनी अल्पवयीन मुलीला त्यांच्याकडे पाठवलं. यावेळी बहिणीच्या पतीने तिच्याशी गैरवर्तन केलं. तिचा हात पकडला आणि विनयभंग करत असताना तिने कसाबसा आपला जीव वाचवला. तिने धावत मोठ्या आईकडे येऊन घडलेला प्रकार सांगितला.

या प्रकरणी मोठ्या आईनं गांभीर्याने दखल घेऊन आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. बहिणीच्या पतीविरोधात पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

First published:

Tags: Chandrapur