Home /News /crime /

अल्पवयीन मुलांना चाबकानं मारहाण, मग करंट देत दिल्या नरक यातना; समोर आलं धक्कादायक कारण

अल्पवयीन मुलांना चाबकानं मारहाण, मग करंट देत दिल्या नरक यातना; समोर आलं धक्कादायक कारण

चोरीच्या संशयातून (Suspected of stealing) 5 लहान मुलांना तालिबानी शिक्षा (Taliban punishment) दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मुलांना दोरीच्या सहाय्यानं बांधून ठेवत चाबकानं मारहाण करण्यात आली

    लखनऊ 16 जुलै : चोरीच्या संशयातून (Suspected of Stealing) 5 लहान मुलांना तालिबानी शिक्षा (Taliban punishment) दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत मुलांना दोरीच्या सहाय्यानं बांधून ठेवत चाबकानं मारहाण करण्यात आली. इतकंच नाही तर डेअरी संचालकानं आपल्या जोडीदारांसोबत मिळून या मुलांना करंटही दिला. ही घटना उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) बरेलीमधील (Bareily) आहे. बारादरी ठाण्याच्या क्षेत्रातील गंगापूर परिसरात अवनेश कुमार यादव डेअरी चालवतात. काही दिवसांपूर्वी त्यांचा 30 हजाराचा फोन चोरी झाला. यानंतर डेअरी संचालकाला शेजारी राहणाऱ्या मुलांवर संशय आला. त्यानं या मुलांना दोरीनं बांधून चाबकानं त्यांना मारहाण केली आणि करंटही दिला. VIDEO:फरसाण न दिल्यानं दुखावला आत्मसन्मान;लॉकडाऊनचं कारण देत पोलिसानं घेतला बदला मुलांच्या कुटुंबीयांना याबाबतची माहिती मिळाली. यानंतर त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी डेअरी संचालकाच्या ताब्यातून या मुलांना मुक्त केलं. यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अल्पवयीन मुलानं या संपूर्ण घटनेबाबत बोलताना सांगितलं, की अवधेश रात्रीच त्याला घेऊन गेला आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. मोबाईल चोरी केल्याचा आरोप केला. चोरी केली नसल्याचं सांगितल्यानंतर त्यानं या मुलांना बांधून ठेवलं. यानंतर चाबकानं मारहाण करत करंटही दिला. पायानंही मारलं. साखळीसाठी सोन्यासारख्या मित्राचा गळा घोटला, मृतदेह सोफ्यात लपवला मुलांनी पाणी पिण्यासाठी मागितलं असता त्यांना पाणीही दिलं नाही. याप्रकरणी बारादरी ठाण्यात सहा जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आरोपींना अटक करण्यासाठी टीम बनवण्यात आली आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Crime news, Shocking news, Uttar pardesh

    पुढील बातम्या