मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

क्लर्कच्या लॉकरमधून 3 कोटींची कॅश, सोनं, चांदी आणि नोटा मोजण्याची मशीन; CBI चे अधिकारीही हादरले!

क्लर्कच्या लॉकरमधून 3 कोटींची कॅश, सोनं, चांदी आणि नोटा मोजण्याची मशीन; CBI चे अधिकारीही हादरले!

एका क्लर्कच्या घरात अधिकाऱ्यांनी काळं धन ठेवण्यासाठी एक गोडाऊन तयार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

एका क्लर्कच्या घरात अधिकाऱ्यांनी काळं धन ठेवण्यासाठी एक गोडाऊन तयार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

एका क्लर्कच्या घरात अधिकाऱ्यांनी काळं धन ठेवण्यासाठी एक गोडाऊन तयार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

  • Published by:  Prem Indorkar

भोपाळ ,29 मे: मध्यप्रदेशाची राजधानी भोपाळमध्ये FCI च्या एका क्लर्कच्या घरात अधिकाऱ्यांनी काळं धन ठेवण्यासाठी (black money recovered) एक गोडाऊन तयार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. CBI च्या छापेमारीत या कर्मचाऱ्याच्या घरातील लॉकरमधून 3 कोटी रुपये, 670 ग्रॅम चांदी आणि 387 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आलं आहे. याशिवाय जमिनीची कागदपत्रंही सापडली आहेत. एका बँक खात्यात 1 कोटी रुपये असल्याची बाब समोर आली आहे. यावेळी सीबीआयला नोट मोजण्याची मशीनही सापडली आहे.

क्लर्क किशोर मीणा याला सीबीआयच्या लाचलुचपत विभागाने एफसीआयच्या तीन अधिकाऱ्यांसह शुक्रवारी सिक्युरिटी एजन्सीकडून लाच मागणे आणि घेण्याच्या प्रकरणात अटक केली आहे. यानंतर शनिवारी सकाळपासून सीबीआयने चौघांच्या घराचा तपास करण्यास सुरुवात केली. क्लर्क किशोर मीणाच्या छोला स्थित घराच्या तपासात मिळालेली कॅश आणि सोनं पाहून अधिकारी हैराण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, तीनही अधिकारी आपली काळी कमाई या क्लर्कच्या घरात लपवित होते.

सीबीआयला तीन अधिकाऱ्यांच्या घरावर छापेमारीदरम्यान काहीच सापडलं नाही. मात्र सीबीआयला किशोर मीणाच्या घराच्या तपासात एक मोठा लॉकर आणि नोटा मोजण्याची मशीन सापडली. लॉकरमध्ये पैसे, सोनं, चांदी होती. सीबीईयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, एफसीआयचे अधिकारी लाचेची रक्कम क्लर्कच्या घरात ठेवत होते.

हे ही वाचा-5 महिने, 11 जिल्हे आणि 96 हून अधिक मृत्यू; कोरोना नाही तर दारूमुळे जातोय जीव

सीबीआय अधिकाऱ्यांना एक डायरीदेखील मिळाली आहे. या डायरीत वेगवेगळ्या तारखांवर पैसे कोणाकडून आणि कधी घेतल्याचं लिहिलं आहे. सांगितलं जात आहे की, यामध्ये कंपन्यांकडून घेतलेली लाच आणि अधिकाऱ्यांची नावं आहेत. सीबीआय आरोपींना कोर्टात हजर करणार आहे. सीबीआयने शुक्रवारी सिक्युरिटी एजन्सीचं 11 लाख रुपयेचं बिल पास करण्यासाठी एक लाखाची लाच घेत असताना एफसीआयच्या चार अधिकाऱ्यांना अटक केली. यापैकी दोन अधिकाऱ्यांना रंगे हात पकडण्यात आलं आहे. तर एका विभागीय मॅनेजर आणि क्लरर्कला नंतर अटक करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार एफसीयमध्ये गुडगावच्या एका सिक्युरिटी कंपनी कॅप्टन कपूर अॅण्ज सन्स कंपनीच वर्षाचं 11 लाखांचं बिल होणार होतं. एफसीआयच्या डिव्हिजनल मॅनेजर हर्ष हिनायना, अकाऊंट मॅनेजर अरुण श्रीवास्तव आणि सिक्युरिटी मॅनेजर मोहन पराते 10 टक्के कमीशन मागत होते. त्यानंतर असं ठरविलं की, जुन्या बिलाचे 50 हजार आणि नव्या बिलाचे 70 हजार रुपये द्यावे लागतील.

या प्रकरणात सिक्युरिटा कंपनीने सीबीआयमध्ये तक्रार केली होती. शुक्रवारी प्लानिंग करुन अकाऊंट मॅनेजर अरुण आणि सिक्युरिटी मॅनेजर मोहन याला रक्कम देण्यासाठी बोलावले होते. येथे त्याने एक लाख रुपये घेतले तसे सीबीआयच्या टीमने त्यांना रंगेहात पकडलं. त्यांनी टीमला सांगितलं की, ही रक्कम ते विभागीय मॅनेजरच्या सांगण्यानुसार घेण्यासाठी आले होते. FCI च्या तीनही मॅनेजर आणि क्लर्क यांना CBI ने शनिवारी विशेष न्यायालयात हजर केले. येथे त्यांना 2 जूनपर्यंत पोलीस रिमांडमध्ये घेण्यात आलं आहे

First published:

Tags: Bhopal News, Madhya pradesh, Money