सुरत, 15 डिसेंबर: हत्याकांडाची एक भयंकर घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. एका मित्रानेच मित्राची हत्या केली आहे. धारधार शस्त्राचा वापर करून त्याने त्याच्या मित्राचा खून केला. धर्मेंद्र असं आरोपीचं नाव असून त्याला त्याचा मित्र रामवर असा संशय होता की त्याच्यामुळे त्याला नोकरी गमवावी लागली. या किरकोळ संशयातून धर्मेंद्रने त्याच्या मित्राचाच खून केला. गुजरातच्या सूरतमध्ये ही घटना घडली आहे.
ही घटना सुरतमधील (Surat) पुणा परिसरात घडली असून या घटनेचा सर्व थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ही घटना घडत असताना आजूबाजूला बरेच लोकं ये-जा करत होती, पण कोणीही त्या मृत तरुणाला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही.
ही घटना सकाळी साडे दहाच्या सुमारास सुरत मधील पुणा परिसरात घडली आहे. या फुटेजमध्ये धर्मेंद्र हातात धारदार शस्त्र घेऊन रामचा पाठलाग करत आहे. धावत असताना राम एका ठिकाणी रस्त्यावर पडला. त्यानंतर पाठलाग करणाऱ्या धर्मेंद्रने त्याच्या हातातील शस्त्राने रामच्या डोक्यावर, पोटावर आणि पायावर 30 पेक्षा अधिक वार केले आहेत. ज्यामध्ये रामचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना घडत असताना आजूबाजूला बरीच लोकं होती. पण हत्या करणाऱ्या धर्मेंद्रचा राग पाहता त्याला रोखण्याचा कोणीही प्रयत्न केला नाही, याउलट तेथून पटकन काढता पाय घेतला.
सुरतमधील हृदयद्रावक घटना....
आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ही हत्या झाली असून तरुणांने धारदार शस्त्राने 30 पेक्षा अधिक वार केले आहेत. #viral pic.twitter.com/jeASobOdqK
— Ravindra (@i_am_Ravindra1) December 13, 2020
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.