लखनऊ 27 फेब्रुवारी : स्थानिक न्यायालयाच्या आदेशानुसार एका अल्पवयीन मुलावर (Minor Boy) लैंगिक अत्याचार (Sexually Abusing) केल्याच्या आरोपावरून महिलेविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोमिना खातून या 45 वर्षीय महिलेनं जुलै 2016 मध्ये अल्पवयीन मुलावर पहिल्यांदा लैंगिक अत्याचार केले. हा मुलगा क्लाससाठी आपल्या शिक्षकाच्या घरी जात असे आणि संबंधित महिला त्याची शेजारी होती. ही घटना उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थ नगर येथे घडली आहे.
कोर्टाने गुरुवारी फौजदारी प्रक्रिया संहिता (सीआरपीसी) कलम 156(3) अन्वये हा आदेश जारी केला आणि त्यानंतर भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यान्वये एफआयआर नोंदविण्यात आलं.
महिलेनं नंतर मुलावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. यानंतर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ती दोन दरोडेखोरांसह मुलाच्या घरी गेली आणि मुलाच्या कुटुंबियांना तिच्या मुलीचं लग्न त्या मुलासह लावून देण्याची मागणी केली. सोबतच असं न केल्यास त्यांच्या मुलाला गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकवण्याची धमकीही महिलेनं दिली. तर, सध्या पदवीचं शिक्षण घेत असलेल्या मुलालाही तिनं धमकी दिली.
सदर पोलीस स्टेशनचे प्रभारी निरीक्षक राजेंद्र यादव म्हणाले, “हे कुटुंब न्यायालयात गेले आणि 5०4 अंतर्गत (शांततेचा भंग करण्याच्या हेतूने केलेला अपमान), 5०6 (फौजदारी धमकी देण्याची शिक्षा) IPC आणि POCSO अंतर्गत महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस सध्या या महिलेचा शोध घेत आहेत.