मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

खासदार राहुल शेवाळेंना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

खासदार राहुल शेवाळेंना ब्लॅकमेल करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

खंडणी वसूल करण्याच्या इराद्याने खोटे आरोप करून खासदार राहुल शेवाळे यांना धमकाविणाऱ्या महिलेविरोधात अखेर मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

खंडणी वसूल करण्याच्या इराद्याने खोटे आरोप करून खासदार राहुल शेवाळे यांना धमकाविणाऱ्या महिलेविरोधात अखेर मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

खंडणी वसूल करण्याच्या इराद्याने खोटे आरोप करून खासदार राहुल शेवाळे यांना धमकाविणाऱ्या महिलेविरोधात अखेर मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

  • Published by:  Chetan Patil

मुंबई, 16 जुलै : खंडणी वसूल करण्याच्या इराद्याने खोटे आरोप करून खासदार राहुल शेवाळे यांना धमकाविणाऱ्या महिलेविरोधात अखेर मुंबईच्या साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर सदर महीलेविरोधात साकीनाका पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणी दाखल केलेल्या एफआयआरबाबत समाधान व्यक्त करून हा सत्याचा विजय आहे, अशा शब्दांत खासदार शेवाळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार शेवाळे यांनी 12 मे रोजी अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयात सदर महिलेविरोधात दाद मागितली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर, आर्थिक फायद्यासाठी जाणीवपूर्वक प्रतिष्ठित व्यक्तीची प्रतिमा मलिन करणे, खासदार शेवाळे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना धमकी देणे आणि ब्लॅकमेल करणे या आरोपांखाली साकीनाका पोलीस ठाण्यात सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(उद्धव ठाकरेंनी दंड थोपटले, संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार, शिवसेना एकजीव करणार)

संबंधित प्रकरणावर खासदार राहुल शेवाळे यांनी प्रतिक्रिया दिली. "गेल्या वर्षभरापासून खोट्या आरोपांमुळे मी आणि माझ्या कुटुंबीयांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. माझी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिमा मलिन करण्यासाठी जाणीवपूर्वक रचलेले हे षडयंत्र असल्याने या प्रकरणाचा पर्दाफाश लवकरच करेन, असे मी याआधीच्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले होते. त्यानुसार माझी बाजू न्यायालयापुढे मांडली आणि अखेर साकीनाका पोलीस ठाण्यात सदर महीलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सत्याचा विजय आहे. यापुढे पोलीस कायद्यानुसार योग्य ती कारवाई करतील याची मला खात्री आहे", अशी प्रतिक्रिया खासदार राहुल शेवाळे यांनी दिली.

दरम्यान, राहुल शेवाळे यांच्यावर संबंधित महिलेने तीन महिन्यांपूर्वी बलात्काराचा आरोप केला होता. महिलेने तीन महिन्यांपूर्वी साकिनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी कोर्टातही खटला सुरु होता. या दरम्यान राहुल शेवाळे यांनी महिलेला आयफोन आणि काही लाख रुपये दिल्याची देखील चर्चा होती. पण ते कितपत खरंय याची शाश्वती नाही. दुसरीकडे राहुल शेवाळे यांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्या प्रयत्न असल्याचीदेखील चर्चा आहेत. या प्रकरणी पोलिसांचा सध्या तपास सुरु आहे.

First published:

Tags: Mumbai, Rahul shewale, Shiv sena