मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

रुग्णाच्या जीवापेक्षा मॉर्निंग वॉक महत्त्वाचं! डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे प्रसूतीनंतर जालन्यातील महिलेचा मृत्यू

रुग्णाच्या जीवापेक्षा मॉर्निंग वॉक महत्त्वाचं! डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे प्रसूतीनंतर जालन्यातील महिलेचा मृत्यू

पोलिसांनी सांगितलं की संबंधित महिला डॉक्टर या महिला रुग्णाला अनुभव नसलेल्या नर्सिंग स्टाफसोबत सोडून मॉर्निंग वॉकला (Morning Walk) गेल्या होत्या.

  • Published by:  Kiran Pharate
जालना 08 ऑगस्ट : शहरातील एका खासगी रुग्णालयात प्रसूतीनंतर 26 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. सरकारी डॉक्टरांच्या एका पॅनेलने या प्रकरणात निष्काळजीपणा आरोप केल्यानंतर पोलिसांनी स्त्रीरोगतज्ज्ञाविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची चौकशी करणाऱ्या शासकीय रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालय (GHMC) औरंगाबादच्या वरिष्ठ डॉक्टरांच्या समितीच्या अहवालाचा हवाला देत पोलिसांनी सांगितलं की संबंधित महिला डॉक्टर या महिला रुग्णाला अनुभव नसलेल्या नर्सिंग स्टाफसोबत सोडून मॉर्निंग वॉकला गेल्या होत्या. 4 महिन्यांच्या मुलीला पायाखाली चिरडलं; तर पदराने गळा आवळून पत्नीचा खून, प्रेमविवाहानंतर तरुणाचं धक्कादायक कृत्य नेहा लिधोरिया नावाच्या रूग्णाचा 13 एप्रिल रोजी प्रसूतीनंतर अतिरक्तस्राव (PPH) किंवा मोठ्या प्रमाणात रक्ताची कमी झाल्यामुळे मृत्यू झाला, असं पोलिसांनी सांगितलं. महिलेला प्रसूतीसाठी 13 एप्रिल 2022 रोजी जालना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिने निरोगी बाळाला जन्म दिला. मात्र, 13 एप्रिल रोजी सकाळी महिला डॉक्टर या रुग्णाला अनुभव नसलेल्या नर्सिंग स्टाफसोबत सोडून मॉर्निंग वॉकसाठी गेल्या. यावेळा महिलेचा प्रचंड रक्तस्त्राव होत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचार्‍यांनी रुग्णाला रक्ताची गरज असल्याची माहिती दिली नव्हती. डॉक्टरांनी रुग्णाची स्थिती आणि रक्ताची गरज याबद्दल कुटुंबीयांना योग्य माहिती दिली नाही. परिणामी, रक्ताचं प्रमाण जास्तच कमी झाल्यामुळे नेहाचा मृत्यू झाला. पुणे : 20 वर्षे आनंदात एका छताखाली राहिले, 50 व्या वर्षी कोथरुडच्या महिलेकडून बलात्काराची तक्रार महिलेच्या पतीने शासकीय जिल्हा रुग्णालयात तक्रार दाखल करून पत्नीच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर तक्रार GMCH पॅनेलकडे पाठवण्यात आली. भारतीय दंड संहितेच्या कलम ३०४ (निष्काळजीपणामुळे मृत्यू) अन्वये स्त्रीरोग तज्ज्ञाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.
First published:

Tags: Crime news, Pregnant woman

पुढील बातम्या