मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

सराईत गुन्हेगारासोबत फोटो काढून केला व्हायरल, पुण्यातील डुप्लिकेट CM वर गुन्हा दाखल

सराईत गुन्हेगारासोबत फोटो काढून केला व्हायरल, पुण्यातील डुप्लिकेट CM वर गुन्हा दाखल

भाजप आणि शिंदे गटाने राज्यात सरकार स्थापन करत एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले.

भाजप आणि शिंदे गटाने राज्यात सरकार स्थापन करत एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले.

भाजप आणि शिंदे गटाने राज्यात सरकार स्थापन करत एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले.

  • Published by:  News18 Desk
पुणे, 19 सप्टेंबर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभुषा व पोषाख परिधान करुन डुप्लिकेट सीएम विजय माने याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय माने याने सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्यासोबत फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करत तोतयागिरी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण - राज्यात जून महिन्यात झालेल्या सत्तांतरानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले. शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला. यानंतर भाजप आणि शिंदे गटाने राज्यात सरकार स्थापन करत एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीचे काही ठिकाणी समर्थन केले जात आहे. तर काही ठिकाणी त्यांच्यावर टीकाही केली जात आहे. यात पुण्यात एकाने डुप्लिकेट सीएम बनत एकनाथ शिंदेंसारखा लुक बनवला आणि सराईत गुन्हेगार शरद मोहोळ याच्यासोबत फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केला. विजय नंदकुमार माने (रा. आंबेगाव) याविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अशा प्रकारचे कृत्य करणार्‍या इतरांविरूध्द देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्याचा आरोप माने याच्यावर करण्यात आला आहे. हेही वाचा - VIDEO : पंढरपूरच्या बालाजीच्या हृदयावर एकनाथ शिंदे, तरुणाने कोरले मुख्यमंत्र्यांचे चित्र मुख्यमंत्री शिंदे यांचा वेश परिधान करत अनेक ठिकाणी नाचण्याचा प्रकार माने याने केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मोहनदास जाधव यांनी बंड गार्डन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
First published:

Tags: Cm eknath shinde, Pune crime news

पुढील बातम्या