नवी दिल्ली 12 ऑगस्ट : ऑनलाईन डेटिंगचं क्रेज दिवसेंदिवस वाढत आहे. डिजीटल युगात डेटिंग अॅपचा (Online Dating App) वापरही भरपूर वाढला आहे. ऑनलाईन डेटिंगचं एक अजब प्रकरण नुकतंच समोर आलं आहे. यात एका 43 वर्षीय शिक्षकानं ऑनलाईन डेटसाठी आपल्या पार्टनरला बोलावलं. यानंतर त्याच्या शरीराचे तुकडे कापून खात हाडं फेकून दिली. ही घटना जर्मनीमधील (Germany) आहे.
नरभक्षक शिक्षकानं (Cannibal Teacher) स्टीफन नावाच्या एका 41 वर्षीय पावर टेक्नीशियनला आपलं शिकार बनवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षकानी पीडित व्यक्तीला भेटण्यासाठी बोलावलं आणि त्याची हत्या (Murder of Partner) केली. यानंतर शरीराचं मांस खात हाडे वेगवेगळ्या ठिकाणी फेकून दिली. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघंही समलैंगिक (Gay) होते आणि बऱ्याच काळापासून एकमेकांना ओळखत होते.
1 हत्या, 2 आरोपी, 170 CCTV कॅमेरे, 230 जणांची चौकशी; असं फुटलं आरोपींचं बिंग
डेटिंगवाल्या जागी काही लोकांना मानवी हाडे आढळून आली. यानंतर पोलिसांनी (Police) स्नाइफर डॉगच्या मदतीनं इतर हाडांचाही तपास लावला. फॉरेन्सिक तपासात हे स्पष्ट झालं, की ही हाडे स्टीफनचीच आहेत. याप्रकरणी बोलताना एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं, की ज्याप्रकारे हाडांपासून मांस वेगळं केलं गेलंय, त्यातून हे स्पष्ट होत आहे, की हत्यारा नरभक्षक आहे.
राहत्या घरी सॉफ्टवेअर इंजिनिअरची गोळ्या घालून हत्या, 20 सेकंदात मारेकरी फरार
पोलिसांनी जेव्हा आरोपी शिक्षकाची वेब हिस्ट्री तपासली तेव्हा समजलं, की तो मागील बऱ्याच काळापासून नरभक्षकांबाबतची माहिती सर्च करत होता. यासोबतच त्यानं हेदेखील सर्च केलं होतं, की एखादा व्यक्ती लिंगाशिवाय जिवंत राहू शकतो का? पोलिसांना आरोपी आणि पीडित व्यक्तीचे ऑनलाईन डेटिंग अॅपवरील मेसेजही मिळाले. आरोपी केमिस्ट्री टीचर आहे. त्याच्या घरातून चाकू जप्त करण्यात आला आहे. यासोबतच आरोपीच्या फ्लॅटमध्ये रक्ताचे डाग आणि काही केमिकलही आढळले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Murder news