इंदूर, 19 ऑगस्ट : लॉकडाऊनच्या (Lockdown) काळात व्यवसाय बंद (business closed) असल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या व्यापाऱ्याने आत्महत्या (Suicide) केल्याची घटना उघड झाली आहे. कोरोनामुळे (Corona lockdown) व्यवसाय बंद ठेवावा लागलेल्या या व्यापाऱ्यावर कर्जाचं (Loan) ओझं वाढत चाललं होतं. त्याचा दबाव सहन न झाल्याने त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
असं वाढलं कर्ज
इंदूरमधील पंकज नाचन यांचा स्टेशनरीचा व्यापार होता. पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाऊनदरम्यान दुकान बंद ठेवावं लागल्यामुळे त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर चढला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंकज यांनी विविध लोकांकडून एकूण 2 लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. ते फेडण्याचा तणाव त्यांना असह्य होत होता. त्यामुळे विष पिऊन आत्महत्या करण्याचा निर्णय़ घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आत्महत्येपूर्वी कुटुंबासोबत सहल
आत्महत्या करण्यापूर्वी काही दिवस पंकज हे कुटुंबासोबत सहलीला जाऊन आले होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी पत्नीला 5 हजार रुपये दिले होते. आपल्या 3 वर्षांच्या मुलीच्या डोक्यावरून हात फिरवत तिला डॉक्टर किंवा इंजिनिअर करण्याची विनंती पत्नीला केली होती. घरातून बाहेर पडण्यापूर्वी आईवडिलांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वादही घेतले होते. त्यानंतर त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली. आत्महत्येनंतर पोलिसांना दोन सुसाईट नोट मिळाल्या आहेत.
हे वाचा -पुण्यात गुंडांचा हैदौस; कोयते अन् तलवारी घेऊन भररस्त्यात नंगानाच, धक्कादायक CCTV
सुसाईट नोटमधून समजली कर्जाची स्थिती
पंकज नाचन यांच्या पहिल्या सुसाईट नोटमध्ये त्यांच्या कर्जाबाबतचे तपशील लिहिलेले होते. आपण हे कर्ज फेडण्यास अपयशी ठरलो. आयुष्यात आपण हरल्यामुळेच आयुष्य संपवण्याचा निर्णय घेत असल्याचं त्यांनी लिहिलं होतं. तर दुसऱ्या सुसाईड नोटमध्ये आपली पत्नी, मुलगी आणि आईवडिलांना त्रास न देण्याची विनंती करण्यात आली होती. आपण आपल्या म्रजीनं आत्महत्या करत असून आपल्या आयुष्यातील ही सर्वात मोठी चूक असल्याची जाणीवही आपल्याला असल्याचं त्यांनी लिहिलं होतं, अशी बातमी 'दैनिक भास्कर'नं दिली आहे.
पंकज यांच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंकज हे काही वर्षांपूर्वीपर्यंत दुसऱ्याच्या दुकानात नोकरी करत होते. तीन वर्षांपूर्वीच त्यांनी स्वतःचं स्टेशनरीचं दुकान सुरू केलं होतं. पंकज यांच्या आत्महत्येमुळे कुटुंबाला धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Gujrat, Small business, Suicide