मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पत्नीचे नोकरासोबत अवैध संबंध; संतापलेल्या व्यावसायिकाची विष खाऊन आत्महत्या

पत्नीचे नोकरासोबत अवैध संबंध; संतापलेल्या व्यावसायिकाची विष खाऊन आत्महत्या

व्यावसायिकाच्या मुलीने याबाबत मोठा खुलासा केला आहे.

व्यावसायिकाच्या मुलीने याबाबत मोठा खुलासा केला आहे.

व्यावसायिकाच्या मुलीने याबाबत मोठा खुलासा केला आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

जयपूर, 26 डिसेंबर : राजस्थानमधील (Rajasthan News) चूरूमध्ये व्यावसायिकाने घरगुती वादातून शनिवारी रात्री विष खाऊन आत्महत्या (Businessman Suicide) केली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि व्यावसायिकाने एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना दुसऱ्या रुग्णालयात रेफर करण्यात आलं. मात्र रुग्णालयात जाताना व्यावसायिकाचा मृत्यू झाला. सादुलपूर पोलिसांनी सांगितलं की, वॉर्ड नंबर 9 चे निवासी पायल भरतियाने दिलेल्या माहितीनुसार, तिची आई राधिकेच्या मृत्यूनंतर वडील राजकुमारने तिची मावशी रेणूसोबत दुसरं लग्न केलं. लग्नाच्या काही वर्षांपर्यंत सर्व व्यवस्थित सुरू होतं. नंतर मात्र तिची सावत्र आई रेणूच्या वडिलांसोबत भांडण करू लागली. मुलीची दुसरी मावशी मीना त्यांच्या घरी येत-जात होती. सावत्र आई वडिलांना न सांगता मीना मावशीला पैसे देत असल्याचं मुलीने सांगितलं. साधारण 7 महिन्यांपूर्वी सावत्र आईने मावशीला तब्बल 20 लाख रुपये आणि सोने-चांदीचे दागिने दिली होते. यावरुन आई-वडिलांमध्ये जोरात भांडण झालं. हे ही वाचा-बाळाला औषध देताना आईकडून घडली मोठी चूक; दुसऱ्या दिवशी ड्रममध्ये आढळला मृतदेह पायलने सांगितलं की, भांडणानंतर आईने माझ्यासह एक बहीण आणि एका भावाला घेऊन दुसऱ्या मावशीकडे निघून गेली. यानंतर आम्ही आजोळी निघून गेलो. त्यानंतर काही दिवसांनी आई पुन्हा घरी परतली. पायलने या प्रकरणात आरोप केला आहे की, घरकाम करणाऱ्या राहुल नावाच्या तरुणासोबत आईचे अवैध संबंध होते. याबद्दल वडिलांना कळताच त्यांनी राहुलला कामावरुन काढून टाकलं. यानंतर सावत्र आई राहुलला कामावर ठेवण्यासाठी दबाव आणत होती. वडिलांनी विरोध केल्यानंतरही ती वडिलांना त्रास देत होती. यामुळे त्रस्त झालेल्या वडिलांनी आत्महत्या केली. पोलीस या प्रकरणात तपास करीत आहे.

First published:

Tags: Business, Rajasthan, Suicide

पुढील बातम्या