मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /एकाच इमारतीमधील 20 फ्लॅटमध्ये चोरी; पेण हादरले

एकाच इमारतीमधील 20 फ्लॅटमध्ये चोरी; पेण हादरले

पेणमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चोरट्यांनी एकाच बिल्डिंगमधील जवळपास पंधरा ते वीस फ्लॅट फोडून चोरी केली आहे.

पेणमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चोरट्यांनी एकाच बिल्डिंगमधील जवळपास पंधरा ते वीस फ्लॅट फोडून चोरी केली आहे.

पेणमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चोरट्यांनी एकाच बिल्डिंगमधील जवळपास पंधरा ते वीस फ्लॅट फोडून चोरी केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी मुंबई,  4 जानेवारी :  पेणमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चोरट्यांनी एकाच बिल्डिंगमधील जवळपास पंधरा ते वीस फ्लॅट फोडून संसारोपयोगी वस्तूंवर डल्ला मारला आहे. एकाच वेळी एवढ्या मोठ्या फ्लॅटमध्ये चोरी झाल्यानं परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. चोरट्यांना लवकरात लवकर पकडण्याचाी मागणी नागरिकांमधून होत आहे.

बिल्डिंग जुनी झाल्यानं रहिवाशांचं स्थलांतर  

घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  पेण शहरातील चिंचपाडा रोडवरील सोनल बिल्डिंगमधील तब्बल 15 ते 20 फ्लॅट फोडून चोरट्यांनी  संसारोपयोगी वस्तूंवर डल्ला मारला आहे. ही बिल्डिंग जुनी झाल्यानं  रहिवाशांनी रिकामी केली होती. परंतु बिल्डरसोबत करार झाल्यानंतर इमरातीलमधून सामान हालवता येईल या विचाराने अनेकांनी आपलं सामान बिल्डिंगमध्येच ठेवलं होतं हीच संधी साधून चोरट्यांनी एकचावेळी पंधरा ते वीस फ्लॅटमध्ये चोरी केली.

लाखो रुपयांचं नुकसान  

चोरट्यांनी अनेक फ्लॅट फोडून संसारोपयोगी वस्तूं चोरून नेल्या आहेत. ज्यामध्ये भांडी, गॅस सिलिंडर, गॅस शेगड्या, हिटर, कपाटं, पंखे, नळ, वायरिंग, महावितरणचे मीटर, लोखंडी ग्रील अशा सामानाचा समावेश आहे. यामुळे रहिवाशांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.

First published:

Tags: Crime, Robbery, Theft