मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /संतापजनक! फी वसुलीसाठी शाळा संचालकाची गुंडगिरी; गार्डद्वारे गोळी मारण्याची दिली धमकी

संतापजनक! फी वसुलीसाठी शाळा संचालकाची गुंडगिरी; गार्डद्वारे गोळी मारण्याची दिली धमकी

एका खाजगी शाळेच्या संचालकाने पालकांकडून फी वसुल करण्यासाठी गुंडगिरीचा अवलंब केला आहे. त्याने पालकांना एका रुममध्ये बोलावून त्यांच्यावर बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

एका खाजगी शाळेच्या संचालकाने पालकांकडून फी वसुल करण्यासाठी गुंडगिरीचा अवलंब केला आहे. त्याने पालकांना एका रुममध्ये बोलावून त्यांच्यावर बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

एका खाजगी शाळेच्या संचालकाने पालकांकडून फी वसुल करण्यासाठी गुंडगिरीचा अवलंब केला आहे. त्याने पालकांना एका रुममध्ये बोलावून त्यांच्यावर बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.

जबलपुर, 06 एप्रिल: जेव्हापासून कोरोना विषाणूने (Coronavirus) भारतात शिरकाव केला आहे, तेव्हापासून शिक्षण क्षेत्रात दुरगामी परिणाम झाले आहेत. कोरोनाने भारतात प्रवेश केल्यानंतर अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा अद्याप खुल्या केल्या नाहीत. त्यामुळे देशातील लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं आहे. देशातील काही शाळांमध्ये ऑनलाइन क्लासेसची (Online classes) सुविधा देण्यात आली. परंतु अनेक विद्यार्थ्यांकडे मोबाइल फोन अथवा लॅपटॉप नसल्यामुळे त्यांना ऑनलाइन क्लासेसना मुकावं लागत आहे. एकंदरित अशी परिस्थिती असतानाही देशातील विविध खाजगी शाळांमध्ये (Private school) प्रशासनाची मनमानी कारभार सुरू आहे. यापूर्वीही शाळा प्रशासनाने पालकांकडून सक्तीनं फी वसूल (School fee) करण्याच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत.

अशातचं उत्तर प्रदेशातील जबलपूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका खाजगी शाळेच्या संचालकाने पालकांकडून फी वसुल करण्यासाठी गुंडगिरीचा अवलंब केला आहे. त्याने पालकांना एका रुममध्ये बोलावून त्यांच्यावर बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. विद्यार्थ्यांची शाळेची फी वसुल करण्यासाठी अशा पद्धतीनं पालकांना धमकावल्यानंतर पीडित पालकांनी शाळेच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पण अद्याप शाळेच्या संचालकाला अटक करण्यात आली नाही.

संबंधित गैरप्रकार जबलपूर शहरातील प्रसिद्ध शाळा 'जॉय सीनियर सेकंडरी स्कुल'चा आहे. या शाळेच्या संचालकाचं नाव अखिलेश मेबन असून त्यांनी शाळेची फी वसूल करण्यासाठी गुंडगिरीचा अवलंब केला आहे. यावेळी त्यांनी संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाला एका बंद खोलीत बोलावून त्यांना गार्डद्वारे गोळी मारण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर पालकांना शिवीगाळही केली आहे.

(हे वाचा - School Fees: पालकांचं ओझं होणार कमी! राज्य शासनाचा मोठा निर्णय)

यानंतर संबंधित पालकाने पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा दाखल केला आहे. आरोपी संचालकाविरूद्ध धमकी देण्यासोबत अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अद्याप संबंधित शाळा संचालकाला अटक केलेली नाही. दुसरीकडे पीडित सत्यम तिवारीनं संचालकाविरुद्ध सक्तीची कारवाई करण्याची मागणी केली आहे.

First published:

Tags: Crime news, Uttar pradesh