Home /News /crime /

Bulli Bai App Case: 18 वर्षीय तरुणी निघाली मास्टरमाईंड, कोण आहे ही मुलगी अन् प्रकरण आहे तरी काय?

Bulli Bai App Case: 18 वर्षीय तरुणी निघाली मास्टरमाईंड, कोण आहे ही मुलगी अन् प्रकरण आहे तरी काय?

Bulli Bai App

Bulli Bai App

Bully Bai App सध्या सोशल मीडियावर बुल्ली बाई या ऍपमुळे वाद निर्माण झाला आहे. या ऍपवरून मुस्लिम महिलांचे तथाकथित लिलाव करण्यात येत असून त्यांचे फोटो अनधिकृतपणे वापरण्यात येत होते.

  मुंबई, 5 जानेवारी: 'बुली बाई अ‍ॅप' प्रकरण वादा(Bulli Bai App Case) संदर्भात मोठी कारवाई करत, मुंबई पोलिसांनी मंगळवारी उत्तराखंडमधील 18 वर्षीय श्वेता सिंगला अटक केली आणि ही मुलगी या संपूर्ण प्रकरणाची मास्टरमाईंड असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचं उत्तराखंड ते बंगळुरु असं मोठं कनेक्शन असल्याचा अंदाज आहे. या प्रकरणात आरोपींचा मोठा ग्रुप असल्याचा संशय पोलिसांना आहे. पोलीस त्या दृष्टीकोनातून तपासही करत आहेत. यापूर्वी, मुंबई पोलिसांच्या सायबर सेलनं एका 21 वर्षीय तरुणाला 'बुली बाई' अॅप्लिकेशन प्रकरणात बंगळुरुमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. दोघांचे विचार जुळल्यानंतर दोघे सोशल मीडियावर संपर्कात आले होते. यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि दोघांनी मुस्लिम मुस्लिम महिलांचे फोटो वापरले जात होते आणि त्यांची बोली लावत होते. 1 जानेवारी रोजी जेव्हा अनेक मुस्लिम महिलांनी त्यांचा फोटो बुल्ली अ‍ॅपवर अपलोड झालेला पाहिल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. GitHub प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून होस्ट करण्यात आलेल्या अ‍ॅपमध्ये मुस्लिम महिलांचे फोटो वापरले जात होते आणि त्यांची बोली लावली जात असल्याचा प्रकार सुरू होता. Bully Bai App : प्रतिष्ठित मुस्लिम महिलांचा 'सौदा' करणाऱ्या 'बुल्लीबाई' अ‍ॅपचा पंचनामा, उत्तराखंड ते बंगळुरु कनेक्शन उघड
   या संदर्भात ट्विटरच्या माध्यमातून ट्रेस झालेल्या विशाल कुमार झा याला प्रथम अटक करण्यात आली आणि त्यानंतर मुंबईच्या सायबर क्राइम सेलने उत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यातील रुद्रपूर येथून श्वेताला अटक केली.

  कोण आहे मास्टरमाईंड श्वेता?

  श्वेता तिच्या तीन भावंडांसोबत रुद्रपूरमध्ये राहते आणि गेल्या वर्षी मे महिन्यात तिच्या वडिलांचा कोरोनामुळे निधन झाले आहे. यापूर्वी 2011 मध्ये तिच्या आईचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. उत्तराखंडच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचा हवाला देत एचटी रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, श्वेता विचारांची होती. आणि सोशल मीडियावर अशा प्रकारचा मजकूर वारंवार पोस्ट करत असे. काय आहे Bulli Bai App, मुस्लिम महिलांशी कसा संबंध? हा गुन्हा किती गंभीर? श्वेता ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत होती. ती 12वी उत्तीर्ण आहे. परंतु अद्याप महाविद्यालयात प्रवेश घेतलेला नाही. श्वेताला मंगळवारी ट्रान्झिट रिमांडसाठी स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून तिला रिमांडवर मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

  बुल्ली बाई (Bullibai) प्रकरण आहे तरी काय?

  बुल्ली बाई (Bully bai) गिटहब (GitHub) नावाच्या ओपन सोर्स प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. सोशल मीडियावरील लोकांच्या माहितीनुसार, हे अ‍ॅप उघडताच एका मुस्लिम महिलेचा चेहरा समोर येतो. याला बुल्ली बाई असे नाव देण्यात आलं आहे. किंमत टॅगसह मुस्लिम महिलांचे आक्षेपार्ह फोटो शेअर केले आहेत. यासोबतच बुल्लीबाई या ट्विटर हँडलवरूनही त्याचा प्रचार केला जात आहे. या अ‍ॅपद्वारे मुस्लिम महिलांना बुक करता येईल, असे ट्विटर हँडलवर लिहिले आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published:

  Tags: Crime news, Cyber crime

  पुढील बातम्या