Home /News /crime /

विशेष समाजाली महिलांना केलं लक्ष्य; Bulli Bai App प्रकरणात मोठी कारवाई. Retweet करणाऱ्यांनाही झटका

विशेष समाजाली महिलांना केलं लक्ष्य; Bulli Bai App प्रकरणात मोठी कारवाई. Retweet करणाऱ्यांनाही झटका

आतापर्यंत मयंक रावत, विशाल झा आणि श्वेता सिंह यांना अटक करण्यात आली आहे.

  मुंबई, 5 जानेवारी : मुस्लीम महिलांचे फोटो अपलोड करून त्यांची बदनामी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या बुली बाई अॅप या (Bulli Bai App) केसवरुन आज (5 जानेवारी, बुधवार) मुंबईचे कमिश्नर ऑफ पोलीस हेमंत नगराळे यांनी (Hemant Nagrale, Mumbai CP) प्रेस कॉन्फ्रेंस आयोजित केली होती. त्यांनी केसबाबत आतापर्यंत केलेल्या कारवाईशी संबंधित माहिती शेअर केली. मीडियाशी बोलताना हेमंत नगराळे म्हणाले की, या प्रकरणात आतापर्यंत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत काय काय कारवाई केली आहे, त्याबाबत माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. आतापर्यंत तिघांना अटक, मुख्य आरोपी श्वेता सिंह हेमंत नगराळे यांनी सांगितलं की, आतापर्यंत या प्रकरणात तिघांना अटक केली आहे. ते पुढे म्हणाले की, आतापर्यंत मयंक रावत, विशाल झा आणि श्वेता सिंह यांना अटक करण्यात आली आहे. मयंक रावंत आणि श्वेता सिंह यांना उत्तराखंड आणि विशाल कुमार झा याला बंगळूरूहून अटक केली आहे. या प्रकरणात श्वेता सिंह मुख्य आरोपी आहे. विशाल कुमार झा 22 वर्षीय आहे. हे ही वाचा-Bulli Bai App : 18 वर्षीय तरुणी निघाली मास्टरमाईंड, कोण आहे ही मुलगी ? खास समाजाच्या महिलांची बदनामी करणं ही मोडस ऑपरेंडी.. मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितलं की, इंटरनेटवर बुल्ली बाई अॅप तयार करण्यात आला. या बुली बाई अॅपचं एक ट्वीटर अकाऊंटदेखील होतं. हा अॅप तयार करण्यामागे काही समाजातील महिलांना बदनाम करणं हा हेतू होता. अॅपवर त्यांचे फोटो अपलोड केले जात होते आणि त्यावर एखादा संदेशही लिहिला जात होता. 31 तारखेला अॅप डेव्हलप केला, आणि 2 तारखेला FIR दाखल हेमंत नगराळे यांनी सांगितलं की, हा अॅप 31 तारखेला डेव्हलप करण्यात आला. आणि 2 तारखेला FIR दाखल करण्यात आली. श्वेता सिंह हिला 5 दिवस आणि विशाल झा याला 7 दिवसांची पोलीस कस्टडी मिळाली आहे. या टीममध्ये अधिक सदस्यांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यानुसार तपास सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. याशिवाय रिट्विट करणाऱ्यावरही कारवाई केली जाऊ शकते, अशीही माहिती समोर येत आहे. यावेळी हेमंत नगराळे म्हणाले की, या प्रकरणाबाबत ज्यांना अधिक माहिती आहे, त्यांनी समोर येऊन पोलिसांना सहकार्य करावं. आमच्या वेबसाइटवर त्यांनी माहिती द्यावी. याशिवाय नागरिक पोलीस ठाण्यात येऊनही याबाबत माहिती देऊ शकतात.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Meenal Gangurde
  First published:

  Tags: Apps, Mumbai, Muslim

  पुढील बातम्या