मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मोबाईलवर गेम खेळण्याच्या नादात थेट झारखंडला पोहोचली, अपहरणाचं गूढ अखेर उकललं

मोबाईलवर गेम खेळण्याच्या नादात थेट झारखंडला पोहोचली, अपहरणाचं गूढ अखेर उकललं

बुलडाणा (Buldhana) जिल्ह्यातील मलकापूर (Malkapur) शहरातील राहणारी 14 वर्षीय मुलगी ही 27 नोव्हेंबरला दुपारी चार वाजेच्या सुमारास क्लासला जाते, असं सांगून घरुन निघाली होती. पण नंतर ती घरी परतलीच नाही. अखेर या मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Chetan Patil
राहुल खंडारे, प्रतिनिधी बुलडाणा, 12 डिसेंबर : मोबाईलवर ऑनलाईन गेम (Online Game) खेळण्याचे व्यसन कोणत्या थराला जाऊ शकतं याचं धक्कादायक उदाहरण मलकापूर (Malkapur) शहरात समोर आलं आहे. 27 नोव्हेंबरला आठवीत शिकणारी 14 वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या वडिलांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात (Malkapur Ploice Sation) दिली होती. त्या मुलीचा शोध लागला असून, मोबाईलवर 'फ्री फायर' (Free Fire) गेम खेळता-खेळता ती झारखंड (Jharkhand) राज्यात पोहोचल्याचं समोर आलंय. विशेष म्हणजे हा सगळा प्रकार पोलिसांना समजला तेव्हा ते देखील चक्रावले. पोलिसांनी मुलीला तिच्या घरी सुखरुप परत आणून तिच्या पालकांकडे सुपूर्द केलंय.

नेमकं प्रकरण काय?

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरातील राहणारी 14 वर्षीय मुलगी ही 27 नोव्हेंबरला दुपारी चार वाजेच्या सुमारास क्लासला जाते, असं सांगून घरुन निघाली होती. त्यानंतर संध्याकाळ होऊनही ती न परतल्याने तिच्या वडिलांनी क्लासमध्ये चौकशी केली. पण ती क्लासला आलीच नसल्याचं तिथल्या शिक्षकांनी सांगितलं. नातेवाईक, मित्रमैत्रिणीकडे चौकशी करुन आणि शोध घेऊनही सापडत नसल्याने तिच्या वडिलांनी अखेर पोलिसात अपहरणाची तक्रार दिली. हेही वाचा : महिलेचा निरवस्त्र शीर नसलेला मृतदेह, माथेरानमधील खळबळजनक घटना

पोलिसांनी प्रकरणाचा छडा कसा लावला?

पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन युद्धपातळीवर तिचा शोध सुरु केला. त्या मुलीला मोबाईलवर फ्री फायर हा ऑनलाईन गेम खेळण्याचं व्यसन लागलं होतं. गेम खेळताना तिची झारखंड राज्यातील उदनापूर येथील 20 वर्षीय तरुणाशी ओळख झाली होती. तो तरुण आणि त्याचा मित्र तिला घ्यायला मलकापुरात आले होते. त्यांच्यासोबत ती झारखंडला गेली होती. झारखंड येथील अहिल्यानगर येथे पोहोचल्यावर त्या तरुणाचे इतर साथीदार गस्तीवर असलेल्या पोलिसांना पाहून फरार झाले होते. त्यामुळे अहिल्यानगर पोलिसांना अल्पवयीन मुलगी आणि तरुण सोबत दिसल्याचं पाहून संशय बळावला. त्यांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर हा प्रकार समोर आला. हेही वाचा : लग्न करण्यासाठी पळून जातानाच दुचाकीला अपघात; प्रेयसीचा भयावह अंत, प्रियकर गंभीर अहिल्यानगर पोलिसांनी मलकापूर पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्याच माहितीच्या आधारावर मलकापूर पोलिसांचं एक पथक 1 डिसेंबरला झारखंडला रवाना झालं. त्या  मुलीला त्यांनी आपल्या ताब्यात घेतले आणि मुलकापूरला आणलं. त्यांनी मुलीचं समूपदेशन केलं. तसेच तिच्या वडिलांकडे सुपूर्द केलं.
First published:

Tags: Crime, Crime news

पुढील बातम्या