बुलढाणा, 14 ऑक्टोबर : बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा (Nandura in Buldhana district) येथील राजेंद्र डांगे यांचा बुलढाणा कारागृहात मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. मात्र यांच्या मृत्यूनंतर तुरुंग प्रशासनावर कुटुंबीयांकडून आरोप केले जात आहेत. कारागृह प्रशासनावर नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत. राजेंद्र डांगे यांच्यासोबत कारागृहात त्यांचा मुलगाही होता.
चार ते पाच दिवसांपासून तब्येत बरी नसल्याने रुग्णालयात भरती करण्यात यावे असा लेखी अर्ज डांगे यांनी कारागृह प्रशासनास दिला होता. मात्र कारागृहाकडून त्यांना वेळेत रुग्णालयात नेण्यात आलं नाही (He was not rushed to the hospital in time). आणि यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे राजेंद्र डांगे यांचा मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईकांनी नकार दिला आहे.
हे ही वाचा-नवमीला नरबळी देण्यासाठी सकाळपासून घेत होता शोध; 35 वर्षीय तरुणाची निघृणपणे हत्या
कारागृह प्रशासनावर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह स्वीकारणार नाहीं अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. बुलढाणा सामान्य रुग्णालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 31 जुलै रोजी राजेंद्र डांगे व त्यांच्या मुलाला एका विनयभंग, दरोडा अशा आरोपात अटक करण्यात आली होती. तेव्हापासून वडील आणि मुलगा दोघे ही कारागृहात होते.
Published by:Meenal Gangurde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.